जळगांव (प्रतिनिधी)*महाराष्ट्राची प्रेरणा आणि अस्मिता, स्वराज्यजननी राजमाता जिजाऊ यांना त्यांच्या 351 व्या स्मृती दिनानिमित्त आदरांजली वाहण्यासाठी आयोजित करण्यात येणारी वार्षिक ‘जिजाऊ महाअभिवादन यात्रा’ यंदाही मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. या यात्रेचे हे चौथे वर्ष असून, 15 जून ते 17 जून 2025 या कालावधीत ही पवित्र महाअभिवादनयात्रा हजारो फोर व्हीलर गाड्यांच्या ताफ्यासह पार पडेल. सर्व शिवभक्तांनी या ऐतिहासिक प्रवासात प्रचंड संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.*
राजमाता जिजाऊंच्या जन्मस्थळ, सिंदखेडराजा येथून या यात्रेची सुरुवात होईल आणि त्यांच्या समाधीस्थळ, पाचाड, रायगड येथे तिचा समारोप होईल.*
*सिंदखेडराजा येथील लखुजीराजे जाधव यांचे वंशज श्री शिवाजीराजे जाधव हे या पवित्र यात्रेचे नेतृत्व करत आहेत.*
*या महाअभिवादन यात्रेत विदर्भ, मराठवाडा, खान्देश, पश्चिम महाराष्ट्र, कोकण विभागातून लोक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो चारचाकी गाड्या या महाअभिवादन यात्रेत सहभागी होण्याची शक्यता आहे. आयोजकांनी सर्व समाज बांधवांना यात्रेत मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आणि स्वतःच्या चारचाकी गाड्यांसह या ऐतिहासिक प्रवासात सामील होऊन राजमाता जिजाऊंना आदरांजली वाहण्याचे आवाहन केले आहे. यात्रेच्या मार्गावर ठिकठिकाणी भव्य स्वागत करण्याचे आवाहनही आयोजकांनी केले आहे, जेणेकरून हा सोहळा जनसामान्यांपर्यंत पोहोचेल.*
*यात्रेचे सविस्तर वेळापत्रक:*
रविवार, 15 जून 2025:
* सकाळी 9 वाजता: सिंदखेडराजा येथे जिजाऊ पूजन करून रथयात्रेला प्रारंभ होईल.
* यात्रेचा मार्ग (वेळा अंदाजित):
* जिजाऊ सृष्टी (9:15 वाजता)
* नाव्हा (9:30 वाजता)
* दत्त मंदिर (9:45 वाजता)
* छत्रपती शिवाजी महाराज चौक जालना (10 वाजता)
* मोतीबाग, छत्रपती संभाजी महाराज चौक (10:30 वाजता)
* चंदनझिरा (11 वाजता)
* सेलगाव (11:15 वाजता)
* बदनापूर (11:30 वाजता)
* शेकटा (11:45 वाजता)
* गोलटगावफाटा (12 वाजता)
* करमाड (12:15 वाजता)
* लाडगाव (12:30 वाजता)
* शेंद्रा, एमआयडीसी चौक (12:45 वाजता)
* जिजाऊ चौक कॅम्ब्रिज (1 वाजता)
* चिकलठाणा (1:25 वाजता)
* रामनगर मुकुंदवाडी (1:30 वाजता)
* ठाकरेनगर, कामगार चौक (1:45 वाजता)
* जयभवानीनगर (2 वाजता)
* हनुमान नगर, पुंडलिक नगर, गजानन मंदिर (2:15 वाजता)
* जवाहर कॉलनी, आकाशवाणी, मोढानाका दुधडेअरी मार्गे.
* दुपारी 2:30 वाजता: क्रांती चौक येथे रथयात्रेचे भव्य स्वागत होईल.
* पुढील मार्ग: बाबा पेट्रोल पंप, छावनी चौक, पंढरपूर विठ्ठल रुक्माई मंदिर येथे महाअभिवादन यात्रेचे भव्य स्वागत (3 वाजता), वाळूज.
* दुपारी 3:30 वाजता: वाळूज टोलनाका येथे दिलीप दादा बनकर पाटील यांच्या हॉटेलवर रथयात्रेचे भव्य स्वागत व जेवणाची व्यवस्था केली आहे.
* पुढील मार्ग (वेळा अंदाजित):
* गंगापूर 5:30 वाजता
* कायगाव 6 वाजता
* प्रवरा संगम 6:15 वाजता
* देवगडफाटा 6:45 वाजता
* नेवासाफाटा 7 वाजता
* घोडेगाव 7:30 वाजता
* पांढरीचापुल 8 वाजता
* रात्रीचे जेवण व मुक्काम: आहील्यानगर येथे असेल.
सोमवार, 16 जून 2025:
* सकाळी 8 वाजता: आहील्यानगर येथून रथयात्रेला पुन्हा सुरुवात होईल.
* यात्रेचा मार्ग: सुपा, रांजणगाव येथे गणपती दर्शन व महाआरती, शिक्रापूर, वढु तुळापूर येथे छत्रपती संभाजी महाराज समाधी दर्शन व महाअभिवादन, भिमा कोरेगाव वाघोली येथे पिल्लाजीराव जाधव यांच्या समाधीचे दर्शन व दुपारचे जेवण, लालमहाल येथे जिजाऊ मासाहेब यांना महाअभिवादन, शिवाजीनगर पुणे, चांदणी चौक, ताम्हिणीघाट, मानगाव.
* संध्याकाळचे जेवण व मुक्काम: नवयुग विद्यापीठ, महाड येथे.
मंगळवार, 17 जून 2025:
* सकाळी 8 वाजता: महाड येथून रथयात्रेला सुरुवात होईल. ही रथयात्रा पाचाड येथे पोहोचेल.
* स्मृती दिनानिमित्त सकाळी 10 वाजता: पाचाड येथील जिजाऊ समाधीस्थळावर लखुजीराजे जाधव यांच्या राजवाड्यातील पवित्र जलाशयाने जिजाऊंचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात येईल. त्यानंतर सर्वांचे अभिवादनपर मनोगत होईल.
* त्यानंतर: रायगडावर जाऊन छत्रपती शिवरायांना महाअभिवादन करण्यात येईल आणि संपूर्ण गडाची माहिती देण्यात येईल.
छत्रपती शिवाजी ब्रिगेड च्या वतीने पवित्र आणि ऐतिहासिक यात्रेत सहभागी होऊन सर्वांनी महाराष्ट्राच्या या महान मातेला आदरांजली वाहून, त्यांच्या त्याग आणि शौर्याचा आदर्श आत्मसात करावा, असे आवाहन केले आहे.*
*अधिक माहितीसाठी संपर्क साधा:9422283233
Leave a Reply