इंदिराबाई ललवाणी विद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा:

जामनेर (प्रतिनिधी):जामनेरपुरा येथील इंदिराबाई ललवाणी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद सिंह यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस उपप्राचार्य डी.झेड. गायकवाड यांनी पूजन व माल्यार्पण करून आदरांजली अर्पण केली. यावेळी पर्यवेक्षक जी. जी.अत्तरदे, क्रीडा विभाग प्रमुख जी. सी. पाटील, सांस्कृतिक समिती अध्यक्षा सविता महाजन, हर्षा दहीलेकर, माधुरी महाजन, दिनेश महाजन, संदीप राजपूत, तालिब तडवी, विजेता परदेशी, वैशाली पाटील, रुपाली पाटील, पूजा पाटील, धनश्री पाटील यांच्यासह शिक्षक-शिक्षिका व खेळाडू उपस्थित होते.

या कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक एस. आर. चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले. क्रीडा शिक्षक समीर घोडेस्वार यांनी आयोजन केले तसेच मेजर ध्यानचंद यांच्या जीवनपटाविषयी माहिती दिली.
—————————————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *