जामनेर(प्रतिनिधी)०१ जुलै कृषी दिन आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा हरित क्रांतीचे प्रणेते स्व वसंतराव नाईक साहेब यांच्या जयंती निमित्त सेवा समर्पण प्रतिष्ठान यांच्या तर्फे अबिंलहोळ गावातील स्मशानभूमी येथे वृक्षारोपण करून स्व.वंसतरावजी नाईक साहेबाची जयंती साजरी करण्यात आली. या वृक्षारोपण कार्यक्रमाला अबिंलहोळ गावातील जेष्ठ देलसिंग नाईक,संत सेवालाल महाराज उत्सव समितीचे अध्यक्ष राजु नाईक,भाजपचे युवा जिल्हा अध्यक्ष नीलेश चव्हाण सर, किशोर नाईक, भाऊसाहेब चिंतामण राठोड, ग्यानदास चव्हाण,लालचंद चव्हाण,विजय चव्हाण, विकास पवार,सरपंच दिलीप चव्हाण, उपसरपंच देवीदास नाईक,उदल नाईक, ठाकुर पवार, अविनाश पवार,गोलू,सचिन चव्हाण आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अबिंलहोळ गावातील नागरिकांचे आणि सेवा समर्पण गृपच्या सर्व सदस्यांचे अनमोल सहकार्य आणि योगदान लाभले.
Leave a Reply