जामनेर(प्रतिनिधी)जामनेर तालुक्यातील डोहरीतांडा येथील जि.प. मराठी शाळेत आज १४/४/२०२५ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रप्रमुख संजय पाटील हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून सेवानिवृत्त ग्रेडेड मुख्याध्यापक
पी.टी.पाटील( शांतीसुत) हे उपस्थित होते. सुरुवातीला उपस्थितांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी पी.टी.पाटील हे सेवानिवृत्त झाल्याने त्यांचा सत्कार तथा स्वागत डोहरीतांडा शाळेच्या वतीने केंद्रप्रमुख संजय पाटील यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. तसेच केंद्रप्रमुख संजय पाटील यांचे स्वागत मुख्याध्यापक राजीव सुके यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी अंजली तंवर, अक्षरा पवार, कल्याणी तंवर, जया तंवर, माधुरी तंवर, पायल तंवर, जान्हवी चव्हाण, मानवी तंवर, रिया तंवर, निखिल तंवर, रोहित तंवर, अर्जुन तंवर, सिध्देश तंवर, प्रितेश तंवर गिरीष तंवर, अमरिता पवार श्याम तंवर, अमित पवार या विद्यार्थ्यांनी भाषणे केली तसेच उपशिक्षक खेमराज नाईक, गंगाराम नरवाडे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक पी.टी.पाटील, केंद्रप्रमुख संजय पाटील यांची भाषणे झाली.
यावेळी इयत्ता पाचवी ते सातवीच्या सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य म्हणून पी.टी.पाटील स्वलिखत चारोळी किलबिल काव्यसंग्रहाचे वाटप करण्यात आले.याप्रसंगी पी.टी.पाटील यांनी विद्यार्थ्यांसमोर बोलतांना सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार अंमलात आणायला हवे. पुस्तकांचे वाचन करा. मोबाईल जास्त हाताळण्यापेक्षा पुस्तके हातात घ्या. वाचनाने माणूस सुसंस्कृत बनतो. चांगल्या शिक्षणामुळे, विचारामुळे, संस्कारामुळे माणूस हा मोठ्या पदापर्यंत पोहचू शकतो. आई -वडील हेच आपले खरे दैवत आहे. आई-वडीलांची आज्ञा पाळावी.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गंगाराम नरवाडे यांनी केले व आभार खेमराज नाईक यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक रोहिदास राठोड, सुभाष तिजारे, श्रीमती दिपाली चव्हाण, देवानंद धुंदाळे यांनी परिश्रम घेतले.
Leave a Reply