जामनेर (प्रतिनिधी)जामनेर, ता. १३ एप्रिल –जामनेर विधानसभा मतदारसंघातील पहुर येथे रेल्वे मालधक्का (Goods Terminal) मंजूर झाल्याची अधिकृत माहिती समोर आली असून, हा निर्णय पहुर व परिसरातील ग्रामस्थांसाठी अत्यंत आनंदाची बाब ठरली आहे.
या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री मा. गिरीश भाऊ महाजन यांनी दिल्लीत विविध पातळ्यांवर सातत्यपूर्ण पाठपुरावा केला. केंद्र शासनाच्या रेल्वे मंत्रालयाशी समन्वय साधून, या भागाच्या गरजा आणि संभाव्य लाभ यावर सविस्तर चर्चा करून या प्रस्तावास मंजुरी मिळवण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली.रेल्वे मालधक्क्यामुळे स्थानिक शेतकरी, व्यापारी, व उद्योजक यांना वाहतुकीची सुलभता, माल पुरवठ्याचा वेग आणि आर्थिक संधी यामुळे मोठा फायदा होणार आहे. हा प्रकल्प पहुरसह आसपासच्या भागाच्या औद्योगिक व आर्थिक विकासाला चालना देणारा ठरणार आहे.या निर्णयानंतर पहुर व परिसरातील ग्रामस्थांनी सामूहिकरित्या एकत्र येऊन आनंद व्यक्त केला व गिरीश भाऊ महाजन यांच्या कार्याचा गौरव केला.ग्रामस्थांनी सांगितले की, “गिरीश भाऊंच्या प्रयत्नांमुळे आज पहुरला ऐतिहासिक प्रकल्प मिळाला आहे. त्यांच्या दूरदृष्टीमुळे आमचा परिसर विकासाच्या नव्या वाटेवर पुढे जात आहे.”स्थानिक जनतेत या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत असून, पहुरचा रेल्वे मालधक्का हा ग्रामीण भागाच्या प्रगतीचा नवा अध्याय ठरणार आहे.
Leave a Reply