जामनेर तालुका मराठा सेवा संघाची नूतन कार्यकारिणी जाहीर…!

जामनेर :- दि. 30/03/2025 रोजी मराठा सेवा संघ संचलित जिजाऊ रथ यात्रा व मराठा जोडो अभियान चे औचित्यसाधत जामनेर तालुका मराठा सेवा संघाची नुतन कार्यकारणी गठित करण्यात आली.
जामनेर येथील मराठा समाज मंगल कार्यालयात आयोजित कार्यक्रमात राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करत जिजाऊ वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष मा.शिवश्री सुमित पाटील तर प्रमुख अतिथी म्हणुन सेवा संघ राज्यउपाध्यक्ष मा.शिवश्री सुरेंद्र पाटील व संभाजी ब्रिगेड विभागीय अध्यक्ष मा.शिवश्री सुरेश पाटील व निरीक्षक म्हणुन जिल्हा उपाध्यक्ष मा.शिवश्री बि.आर.पाटील सर व विशाल ला़ॅन चे संचालक डि. एन. चोैधरी विचारमंचावर उपस्थित होते.

मराठा सेवा संघाच्या तालुकाध्यक्ष पदी *शिवश्री दिपक ढोणी पाटील* तर कार्याध्यक्षपदी शिवश्री. प्रमोद पाटील, उपाध्यक्षपदी शिवश्री दिपक वारांगणे पाटील, तालुका सचिव शिवश्री किशोर पाटील , शिवश्री प्रविण पाटील सहसचिवपदी व संघटक पदी शिवश्री दशरथ भाऊ पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली. प्रमुख अतिथी व मान्यवरांच्या मार्गदर्शक मनोगता नंतर मान्यवरांच्या हस्ते नुतन कार्यकारणीचे स्वागत करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या व 21 एप्रील रोजी मराठा सेवा संघ संचालित जिजाऊ रथ यात्रे संदर्भात चर्चा करण्यात आली.

यावेळी तालुक्यातील सेवा संघ कार्यकर्ते सामाजीक व राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी ,शिक्षक मंडळी ,वार्तांकन करणारे वार्ताहार, बहुजन परिवर्तनवादी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.जिल्हाकार्यध्यक्ष शिवश्री. योगेश पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मांडले. शिवश्री दिपक वारांगणे पाटील यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले तर नवनियुक्त तालुकाध्यक्ष शिवश्री दिपक ढोणी पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानुन कार्यक्रमाची सांगता केली.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *