जामनेर(प्रतिनिधी)आज दिनांक २२ मार्च २०२५, रोजी संपूर्ण राज्यात महाराष्ट राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचेकडिल आदेशान्वये राष्ट्रीय लोक न्यायालयाचे आयोजन करणेत आले होते. त्या अनुषंगाने दिवाणी व फौजदारी न्यायालय, क. स्तर जामनेर येथे आयोजीत लोकन्यायालय मोठ्या उत्साहात पार पाडले. सदर लोक न्यायालयात न्यायालयीन प्रलंबित प्रकरणांत एकुण 109 प्रकरण निकाली निघाली. तर, वादपुर्व प्रकरणांतील एकुण 1318 प्रकरणे निकाली निघाली. जामनेर न्यायालयातुन एकूण 1427 प्रकरणे निकाली निघाली.
सदर लोक न्यायालयातुन एकुण 1,15,09,158.05 इतक्या रूपये ची तडजोडी अंती वसुली झाली.सदर लोकन्यायालयास पॅनल प्रमुख म्हणुन, दिवाणी न्यायाधीश तसेच तालुका विधी सेवा समिती जामनेर चे अध्यक्ष, श्री.दि.न.चामले यांनी कामकाज पाहिले. तर पॅनल सदस्य म्हणुन अॅड. अनिता पी. पाटील यांनी कामकाज पाहिले. सदर लोकन्यायालयास जामनेर न्यायालयाचे सह. दिवाणी न्यायाधीश श्री. बी.एम. काळे व दुसरे सह दिवाणी न्यायाधीश श्री.पी.व्ही. सुर्यवंशी हे देखिल हजर होते. सदर लोक न्यायालयाचे उद्घाटन करणेपुर्वी श्री.दि.न.चामले, व काळे यांनी उपस्थित पक्षकार यांना विधी सेवेबाबत माहिती दिली.
दरम्यान मध्यस्थी व लोकन्यायालयाचे महत्व पटवुन सांगणेत आले. तसेच विधी सेवा बाबत सेवा विषयी माहिती देण्यात आली. ज्येष्ठ नागरीक कायदा, कौटुंबिक वाद, दिवाणी स्वरूपाचे वाद, फौजदारी केसेस, भारतीय राज्यघटना, नविन तीन कायदे, बालकांचे हक्क व अधिकार, पोक्सो अॅक्ट, ग्राहकांचे हक्क व संरक्षण कायदा, या विविध विषयांवर माहिती देण्यात आली. सदर कार्यकमाचे सुत्रसंचालन अॅड. डि.व्ही. राजपुत, यांनी केले. सदर कार्यक्रमांस वकिल सघ जामनेर यांनी सहभाग नोंदविला. वकिल संघाचे अध्यक्ष, के. पी. बारी, सचिव डि.बी. गोतमारे, सरकारी वकिल सौ. कृतिका भट, व सौ. आर.आर.चव्हाण, हे देखिल हजर होते. सदर लोक न्यायालयाचे तडजोडीतुन एकुण 3 जोडपी त्यांचे सासरी नांदावयास गेली. तसेच इतर तीन कौटुंबीक वाद असलेल्या प्रकरणांत अॅड. के.डि. बनकर, अॅड. अशुतोष चंदेले, अॅड. व्ही.पी. वंजारी, अॅड. के.एच. बौधरी, अॅड.एस.वाय. वाघ, यांनी तडजोड यशस्वी घडवुन आणणेत महत्वाची भुमिका पार पाडली. तसेच सदर लोकन्यायालयास अॅड. एस.एम. साठे, अॅड. अनिल डि. सारस्वत, अॅड. बी. एन. बावस्कर, अॅड.ए.पी.डोल्हारे, अॅड. डि.बी.बोरसे, अॅड.पी.जी. शुक्ला, अॅड. डि.ई. वानखेडे, अॅड. के. बी. राजपुत, अॅड.पी.जी. शुक्ला, अॅड. अॅड. शुभांगी फासे, अॅड. प्रसन्न पाटिल, अॅड. पारळकर, अॅड. एन.टि.बौधरी, तसेच मा. वकिल संघाचे सर्व विधीज्ञ हजर होते. सदर लोकन्यायालयास बँक कर्मचारी, बी.एस.एन.एल., पंचायत समिती जामनेर, पोलिस कर्मचारी, सर्व न्यायालयीन कर्मचारी, ग्राम पंचायत कर्मचारी यांनी अनमोल सहकार्य केले.
Leave a Reply