जामनेर- (प्रतिनिधी)-आयुष्य हे जसं सुंदर फुलांची गुंफण आहे तसंच कधी कधी त्यात काटेरी कुंपणही येतात .
काही आजार हे व्यक्तीला अंतर्बाह्य हेलावून टाकणारे व हादरवून टाकणारे असतात. त्यातीलच एक आजार म्हणजे स्तनाचा कर्करोग . या आजाराला घाबरून रडत बसू नका .तर झुंज द्या… लढा.. असा संदेश वैद्यकीय अधिकारी समर्थ हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर सौ. स्वाती मनोज विसपुते यांनी महिला दिनाच्या दिवशी उपस्थित महिलांना दिला .
डॉक्टर सौ. विसपुते पुढे म्हणाल्या की स्तनांचा कर्करोग हा शब्द नुसता लिहिताना ,बोलताना, ऐकताना खूप भयावह वाटतं . पण नुसत घाबरून प्रश्न तर सुटत नाहीत ?
त्यातच सध्या या आजाराने ग्रस्त होणाऱ्या रुग्णांची वाढती संख्या बघून जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने माझ्या सख्यांना या आजाराबाबत कोणती काळजी घ्यावी ?
कोणत्या प्रकारच्या तपासण्या कराव्या? घाबरून न जाता एकमेकींना आधार कसा द्यावा ? याबद्दलही त्यांनी मार्गदर्शन केले. अंतर बाह्य पोखरून काढणाऱ्या या आजाराविरुद्ध
रडायचं नाही …….तर हिमतीने लढायचं या मानसिकतेने झुंज देत असलेली माझी वीरांगणा …… (नावाचा उल्लेख मुद्दाम टाळत आहे ) सखीला आम्ही सगळे तुझ्या पाठीशी आहोत असा खंबीर आधार देऊन तिच्याकडून प्रत्येकीने जगण्याची प्रेरणा घेतली……. तसेच सतरा वर्षांपूर्वी या आजाराशी खंबीरपणे लढा देऊन……17 वर्षानंतरही अत्यंत निरोगी व आनंदी आयुष्य जगणाऱ्या पुण्यातील सखी यांचा अनुभवाचा ऑडिओ ऐकला…. हसत खेळत जगण्याने मोठे मोठे आजारही छोटे छोटे होऊन आपल्यापासून धूम ठोकून दूर पळतात हा जीवनपाठ डॉक्टर मनोज विसपुते यांनी यावेळी विविध उदाहरणे देऊन शिकविला.
Leave a Reply