जामनेर शहरामध्ये नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्टाना तर्फे स्वच्छता अभियानात १०.३७० टन कचरा संकलन

Oplus_131072

जामनेर(प्रतिनिधी)दि.२ मार्च महाराष्ट्र भुषण आदरणीय तीर्थरूप डॉ . श्री . नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा तर्फे जामनेर शहरात महास्वच्छता अभियान राबविण्यात आले.दि. २ मार्च रोजी जामनेर नगरपालिके समोर जामनेर नगरीच्या नगराध्यक्षा सौ.साधनाताई महाजन यांच्या हस्ते सकाळी ८ वाजुन ३० मिनिटांनी महास्वच्छता अभियानास सुरुवात करण्यात आली. या वेळी नगर परिषदेचे सी.ई.ओ. नितीन बागुल, महेंद्र बाविस्कर, आतिश झालटे, जितू पाटील, डॉक्टर प्रशांत भोंडे इ. मान्यवर व श्री बैठकीतील श्रीसदस्य स्वच्छता अभियान प्रसंगी उपस्थित होते. महास्वच्छता अभियानामध्ये जामनेर शहरातील मुख्य रस्ते दोन्ही बाजूनी स्वच्छ करण्यात आले. तसेच शासकिय इमारतीं , शासकिय तांत्रिक विद्यालय, आय टी. आय कॉलेज, विश्रामगृह , पोलिस निरीक्षक बंगला, सरकारी हॉस्पिटल, सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय, बस स्टॉप, तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, नगर परिषर कार्यालय , न्यायालय परिसर, मधूबन कॉलनी सह अनेक ठिकाणी स्वच्छता करण्यात आली.

Oplus_131072

या स्वच्छता अभियानामध्ये १२ ट्रैक्टर, ७ मालवाहू रीक्षा या वाहनांमार्फत ६८१ श्री सदस्यांकडून 3.५२० टन ओला कचरा व ६.८५० टन सुका कचरा.असा एकूण १०.३७० टन कचरा संकलित करण्यात आला. या सर्व कचऱ्याची विल्हेवाट ओझर रस्त्यावरील डम्पिंग ग्राऊंड याठिकाणी करण्यात आली.

जामनेर शहरात केलेल्या डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान तर्फे महास्वच्छता अभियानाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *