
Oplus_131072
जामनेर (प्रतिनिधी)भारतीय जनता पार्टी संघटन पर्व अंतर्गत राज्यभरात सुरू असणाऱ्या प्राथमिक सदस्यता नोंदणी अभियानामध्ये रवींद्र रमेश झाल्टे अध्यक्ष – भाजपा जामनेर शहर यांनी १००० वैयक्तिक सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट पूर्ण केलेत, “राष्ट्र प्रथम, त्यानंतर पक्ष आणि शेवटी स्वतः” हा आपल्या भाजपा परिवाराचा मूलमंत्र मनात ठेवून अंत्योदयाच्या दिशेने सुरू असणारा आपला प्रवास कौतुकास्पद आणि अभिमानास्पद आहे.आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात भारत विश्वगुरु होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. तसेच आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र प्रगतीपथावर वेगवान घोडदौड करत आहे. विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्र हे ध्येय साकार करण्यासाठी भारतीय जनता पार्टी अधिकाधिक सशक्त होणे गरजेचे आहे.संघटन पर्वात १००० प्राथमिक सदस्यांना आपल्या भाजपा परिवारामध्ये सामील करून घेत आपण त्यामध्ये मोलाचे योगदान दिले आहे. हे राष्ट्रकार्य आपण असेच अविरत सुरू ठेवाल, असा विश्वास रविंद्र चव्हाण भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष यांनी व्यक्त करीत आपल्या या योगदानाबद्दल आपले पुन्हा एकदा सहर्ष अभिनंदन !केले आहे.
Leave a Reply