वडीलांच्या जन्मशताब्दीनिमित्ताने “माय” व “बाप” काव्यसंग्रहाच्या पुस्तकांचे केले वाटप. सेवानिवृत्त मुख्याध्यापक पी.टी.पाटील यांचा विशेष उपक्रम.

जामनेर(प्रतिनिधी)जामनेर येथील वाकी रोडवरील जि.प मराठी शाळेत संपन्न झालेल्या केंद्रप्रमुखांच्या सहविचार सभेत सेवानिवृत्त ग्रेडेड मुख्याध्यापक पी.टी.पाटील यांनी संपादित केलेल्या ‘माय’ तसेच ‘बाप’ या काव्यसंग्रहाचे वाटप जामनेर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी आर. ए. लोहार यांच्या हस्ते बेटावद, फत्तेपूर, गारखेडा, जामनेर, मालदाभाडी, नाचणखेडा, नेरी दिगर, पाळधी, शहापूर, टाकळी, तोंडापूर, तोरनाळे, वाकडी, वाघारी, वाकोद, जामनेर उर्दू, पहूर उर्दू या केंद्राच्या केंद्रप्रमुखांना करण्यात आले.

याप्रसंगी केंद्रप्रमुख संजय पाटील, विकास वराडे, डी. डी. घ्यार, सुरेश अंभोरे, किरण पाटील, नवल राजपुत, शेख रईस, शेख ईस्माईल, बाबुराव धुंदाळे, विजय गायकवाड, प्रदीप जाधव, संदीप पाटील श्रीमती शुभांगी पाटील, सौ. संगिता पालवे केंद्रप्रमुख उपस्थित होते. तालुक्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी आणि वडिलांच्या जन्मशताब्दीनिमित्ताने ‘माय’ व ‘बाप’ काव्यसंग्रह वाटप करण्यामागचा उद्देश पी.टी.पाटील यांनी सांगितला.  गटशिक्षणाधिकारी आर. ए. लोहार यांनी सांगितले की, माय व बाप या काव्यसंग्रहामुळे विद्यार्थ्यांना काव्यरचनेची आवड निर्माण होईल आणि माय बापाचे महत्व या काव्यसंग्रहातून होईल.
राज्यपुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक संदीप पाटील यांनी प्रास्तविकातून माय व बाप या काव्यसंग्रहाचा परिचय करून दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *