जळगांव /जामनेर (प्रतिनिधी) नाशिक विभागात सर्वोत्तम कार्य केल्याबद्दल जळगाव जिल्हाधिकारी श्री. आयुष प्रसाद यांना “बालस्नेही पुरस्कार- 2024” ने सन्मानित करण्याची घोषणा करण्यात आली आहे!
बालहक्क संरक्षण तसेच जळगाव जिल्ह्यातील कुपोषण मुक्तीसाठी केलेल्या भरीव कार्याची दखल महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने घेतली आहे.
सदर पुरस्कार सोहळा यशवंतराव चव्हाण सेंटर, जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग, नरिमन पॉईट, मुंबई येथे दि.०३/०३/२०२५ रोजी दुपारी १.०० वाजता संपन्न होणार आहे. सदर कार्यक्रम मा.ना.श्री. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, मा.ना.श्री. अजित पवार, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य तसेच मा.ना. कु. आदिती तटकरे, मंत्री, महिला व बाल विकास विभाग, श्री.योगेश कदम, राज्यमंत्री, गृह (शहरी), मा. ना. श्रीम. मेघना बोर्डीकर, राज्यमंत्री, महिला व बाल विकास विभाग यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.
या यशामध्ये जळगाव जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी सेविकांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्या मेहनतीला मान्यता मिळाल्याबद्दल सर्वांचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी अभिनंदन केले आहे !
Leave a Reply