जळगाव/जामनेर (प्रतिनिधी) येथील राष्ट्रीय महामार्गालगतच्या जलाराम मंदिराशेजारील चेतना व्यसनमुक्ती उपचार केंद्रातील साधना सभागृहात पुण्यातील निसर्गोपचार तज्ज्ञ डॉ. सुनील चव्हाण यांचे मंगळवारी, २५ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत ‘करू या लिव्हर अन् किडनी सोबत मैत्री’वर व्याख्यानात सविस्तर मोफत मार्गदर्शनाचे आयोजन केले आहे.
व्याख्यानात “लिव्हर फेल्युर आणि किडनी फेल्युर”वर तसेच लिव्हर संबंधित आजार आणि त्याबाबत काही समस्या असतील तर त्यावर उपचार काय आहेत? काय केले पाहिजे? काय काळजी घेतली पाहिजे? आहार काय घेतला पाहिजे? याबाबत मार्गदर्शन केले जाईल.
आपल्या लिव्हरच्या आरोग्यासाठी आपण मार्गदर्शन व्याख्यानाचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
Leave a Reply