जळगाव जिल्ह्यातील नागरिकांसाठी सुवर्णसंधी! जिल्हा प्रशासनाशी थेट संवाद साधा, आपल्या अडचणी मांडा आणि तत्काळ निराकरण मिळवा!

जामनेर(प्रतिनिधी)जळगांव संवाद सेवा: नागरिक आणि प्रशासन जोडणारा दुवा” या उपक्रमाचा शुभारंभ आज जिल्हाधिकारी श्री. आयुष प्रसाद यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

🖥️ व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे प्रत्यक्ष संवाद:

📅 दररोज (शासकीय सुट्ट्यांव्यतिरिक्त) जिल्हा प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत थेट संवाद साधण्याची सुविधा नागरिकांना मिळणार आहे.

आजच्या प्रथम सत्रात उपजिल्हाधिकारी महसूल श्री. विजयकुमार ढगे यांनी नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या व उपाययोजना सुचवल्या.
द्वितीय सत्रात जिल्हा पुनर्वसन अधिकारी श्री. गजेंद्रकुमार पाटोळे यांनी नागरिकांशी संवाद साधला.
याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी श्री. अंकुश पिनाटे आणि निवासी उपजिल्हाधिकारी श्री. भिमराज दराडे, जिल्हा सुचना व विज्ञान अधिकारी श्री. महेश पत्की, जिल्हा नियोजन अधिकारी श्री. विजय शिंदेयांचीही उपस्थिती होती.
या सुविधेचा लाभ घ्या आणि आपल्या समस्या सोडवण्यासाठी प्रशासनाशी थेट बोला!

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसाठी लिंक:
प्रथम सत्र: [https://tinyurl.com/DMJALWEB1](https://tinyurl.com/DMJALWEB1)
वेळ: सकाळी 10:00 ते 11:00
द्वितीय सत्र: [https://tinyurl.com/DMJALWEB2](https://tinyurl.com/DMJALWEB2)
वेळ: सकाळी 11:30 ते 12:30
प्रशासन तुमच्या दारात या अभिनव संकल्पनेचा लाभ सर्व नागरिकांनी घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी श्री आयुष प्रसाद यांनी केले आहे.
#JalgaonSamvadSeva #NagarikSathiPurnank #प्रशासनतुमच्या दारात #DigitalGovernance

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *