जामनेर (प्रतिनिधी) जामनेर येथील ज्येष्ठ नागरिक सेवा संघात छत्रपती शिव जन्मोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. संघाचे अध्यक्ष श्री किशोर पाटील होते. प्रथम त्यांचे हस्ते शिवाजी महाराजांच्या फोटोस माल्याप॔ण करण्यात आले. नंतर उपस्थितांनी पुष्प अप॔ण करून अभिवादन करण्यात आले. प्रास्ताविक सचिव रजनीकांत महाजन यांनी केले. ज्येष्ठ संचालक श्री चिंचकर सर, श्री डोळे साहेब व श्री काळे सर यांनी आपाअपल्या मनोगतातून शिवाजी महाराजांच्या बद्द्ल सविस्तर माहिती सांगितली. याप्रसंगी सौ.वैष्णवी जैन यांनीही मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन श्री चिंचकर सर यांनी केले. संचालक श्री बाबुराव सौतवाल यांनी आभार मानले. याप्रसंगी उपाध्यक्ष श्री पांडूरंग आप्पा, डाॅ जगदीश महाजन, भागवत महाजन रामभाऊ देशमुख अनंत राव पाटील भागवत गुरुजी अवधूत सोनवणे हरी भाऊ पालवे शमा महाराज प्रताप पाटील राणे महेंद्र महाजन भागवत गुरुजी दादा लामखेडे श्रराम महाजन साहेब काळे सर डोळे साहेब उपस्थित होते. जय भवानी जय शिवाजी व छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देण्यात आल्या. पेढे वाटप वचहापाना नंतर पसायदानाने काय॔क्रम संपला.
Leave a Reply