जामनेर(प्रतिनिधी)जामनेर येथील वाकी रोड वरील गरूड कोचिंग क्लासेस मध्ये शिवजयंती मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त ग्रेडेड मुख्याध्यापक प्रभाकर तुकाराम पाटील (पी.टी.पाटील) हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून विनोद राऊत सर उपस्थित होते. उपस्थितांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व पुष्पहार अर्पण करण्यात आला.
याप्रसंगी हिरण्या संदीप उघडे, पार्थ गजानन शिंदे, कृष्णल संदिप उघडे यांनी भाषणे केली व पोवाडा आदित्य सुनिल सपकाळ या विद्यार्थ्याने म्हटला. कार्यक्रमाचे अध्यक्ष सेवानिवृत्त ग्रेडेड मुख्याध्यापक पी.टी.पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी माहिती सांगितली व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने सामान्यज्ञान स्पर्धा इयत्ता पाचवी ते सातवी ‘अ तसेच आठवी ते दहावी ‘ब’ गटात घेण्यात आली.एकूण ११५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विजयी स्पर्धक पुढीलप्रमाणे.
‘अ’ गट:- १)हिरंण्या संदीप उघडे:- इयत्ता – ४थी (प्रथम)
२)देवयानी प्रदीप घ्यारे :- इयत्ता – ५ वी (प्रथम)
३)खुशी दिपक पाटील:-इयता – ६ वी (द्वितीय)
४)आदित्य सुनिल सपकाळ:- इयत्ता – ७ वी (द्वितीय)
५)देवयानी गजानन शिंदे:- इयत्ता – इयत्ता – ७वी (तृतीय)
‘ब’गट :- १) सारिका ज्ञानेश्वर देवकर :- इयत्ता – ९ वी (प्रथम)
२)मिनाली संदीप पाटील :- इयत्ता – ९ वी (प्रथम)
३)अनुस्का अनिल ठोंबरे:- इयत्ता – ९ वी (द्वितीय)
४)प्रसाद गोपाल दहातोंडे :- इयत्ता – ८ वी (तृतीय)
५)गायत्री ईश्वर कोळी :- इयत्ता – ८वी (तृतीय)
सामान्यज्ञान स्पर्धेचे आयोजन तसेच विजयी स्पर्धकांना पी.टी.पाटील यांच्यातर्फे शैक्षणिक वस्तुंद्वारे आणि प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन गरड कोचिंग क्लासेस चे संचालक संदीप उघडे यांनी केले व संचालिका सौ. शकुंतला उघडे यांनी आभार मानले.
Leave a Reply