जामनेर (प्रतिनिधी) सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील विजयानंद हॉस्पीटल , जामनेर द्वारा आयोजीत हिंदुस्थान चे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज सोबतच श्री संत सेवालाल महाराज , स्वच्छतेचे जनक श्री संत गाडगे महाराज व श्री संत रविदास महाराज या सर्व महापुरुषांच्या जयंती निमित्त प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करीत
सामाजिक बांधिलकी जपण्याकरता महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले होते .75 रक्त दात्यानी शिवजयंतीचे औचित्य साधतं रक्तदान केले. शिवजयंतीच्या शुभ मुहूर्तावर विजयानंद हॉस्पिटल आयोजित रक्तदान शिबीर व देहदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
डॉ विजया पाटील, डॉ नंदलाल पाटील,प्रल्हाद बोऱ्हाडे. प्रफुल्ल पाटील,महेश राणे, नितीन झोपे, अभिनंदन जैन, मनोज माळी,स्वप्नील पाटील, अंगद पाटील,वैभव माळी,डॉक्टर मंदार पाटील,डॉक्टर शुभम साळवे,डॉक्टर साक्षी पाटील, डॉक्टर जोशना पाटील,नवलसिंग गुरुजी,श्री अनंतराव पाटील भगवान ओंकार पाटील,संजय पाटील,डॉक्टर गजानन पाटील, कैलास आत्माराम पाटील, श्री अरुण ईश्वर पाटील, अनिरुद्ध पाटील,संदीप पाटील,डॉक्टर मनोज पाटील खादगावकर, नितीन भोई,संतोष नाईक या सर्वांची उपस्थिती होती.
Leave a Reply