जामनेर(प्रतिनिधी)अध्यक्ष ग्राहक पंचायत महाराष्ट्र पारशिवणी तालुका, तर्फे सौ कांचनमाला माकडे यांच्या सहकार्याने व मार्गदर्शनाने सुनिता ताई मानकर ,
यांनी” संक्रांत महोत्सव “माहेर मंच च्या संयुक्त विद्यमाने,आयोजित केलेला होता. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व आदरणीय बिंदू माधव जोशी यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून,
अध्यक्ष ग्राहक पंचायत महाराष्ट्र नागपूर ग्रामीण सौ कांचनमाला मोरेश्वर माकडे या होत्या. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सौ रश्मी बर्वे,माहेर मंचच्या अध्यक्ष रिता नरेश बर्वे यांच्या हस्ते ग्राहक पंचायत महाराष्ट्राच्या कॅलेंडरचे विमोचन करण्यात आले,यांना व माहेर मंचच्या सर्व कार्यकारणी पदाधिकारी महिलांना ग्राहक पंचायत महाराष्ट्राचे कॅलेंडर वितरित करण्यात आले .
सुनीताताई मानकर यांनी अतिशय उत्कृष्ट असे कार्यक्रमाचे आयोजन केले त्यांचे खूप खूप कौतुक व खूप खूप अभिनंदन मानकर मॅडम शेकडो महिलांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला ग्राहक पंचायत महाराष्ट्राचे कार्य यानिमित्ताने महिलांना सांगण्यात आले.
Leave a Reply