जामनेर येथे खानदेश स्तरीय पंधरावे मराठी साहित्य संमेलन संपन्न! प्रा.रामकृष्णा महाराज पाटील यांच्या “तुकावतारी संत श्री गोविंद समर्थ” चरित्र ग्रंथाला जिल्हा स्तरीय प्रथम पुरस्कार प्रदान!


जामनेर(प्रतिनिधी)जामनेर तालुका साहित्य व सांस्कृतिक मंचाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पंधराव्या खानदेश स्तरीय मराठी साहित्य संमेलनाला जामनेर येथे प्रचंड प्रतिसाद लाभला. दिवसभर साहित्यिकांनी या साहित्य संमेलनाला मोठ्या प्रमाणात उपस्थिती दिली. सोबतच विविध साहित्यकृती निर्माण करणाऱ्या कवींचा साहित्य संमेलनात गौरव करण्यात आला. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी प्रा. त्रिशीला तायडे या होत्या तर उद्घाटक म्हणून अनिलकुमार बोहरा हे होते. साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्षपद जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्री. दिलीप खोडपे सर यांनी भूषविले.

सकाळी नऊ वाजता ग्रंथदिंडीने कार्यक्रमाचा आरंभ झाला. नंतर प्रमुख अतिथींच्या हस्ते साहित्य संमेलनाचे दीप प्रजलित करून उद्घाटन करण्यात आले. यावेळी जेष्ठ कवी ज्ञानेश्वर घुले, प्रा. रामकृष्णा महाराज पाटील, जामनेर तालुका साहित्य व सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष डी.डी.पाटील, सेवानिवृत्त शिक्षक व साहित्यिक पी. टी. पाटील, साहित्यिक हे व्यासपीठावर उपस्थित होते.
या जिल्हास्तरीय साहित्य संमेलनात जामनेर येथील संत साहित्य आणि सुमारे 100 गुण अधिक आध्यात्मिक ग्रंथांचे लेखक प्राध्यापक रामकृष्ण महाराज पाटील जामनेरकर यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या तुकावतारी संत श्री गोविंद समर्थ या अखंड अभंग चरित्र ग्रंथाला जामनेर तालुका साहित्य व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने प्रथम क्रमांकाचा जिल्हास्तरीय पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते प्रा.रामकृष्णा महाराज यांना गौरविण्यात आले.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष डी डी पाटील, सचिव गोरख सूर्यवंशी, सहसचिव जितेंद्र रामकृष्ण गोरे, खजिनदार सुखदेव महाजन, सदस्य सौ प्रतिभा नरवाडे, प्राध्यापक विनोद जाधव, शंकर भामरे सर, श्रीकांत पाटील सर, विजय सूर्यवंशी, विजय सैतवाल, श्री कृष्णा माळी, श्री.एस. टी.चौधरी सर , गणेश राऊत, साहित्यिक विशाल नवले ( छत्रपती संभाजी नगर), सौ पुष्पलता पाटील, डी.एस.पाटील सर,कवी माणिकराव सोनवणे यांच्यासह जामनेर शहरातील साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुरस्कार स्वरूपात प्राध्यापक रामकृष्णा महाराज पाटील यांना सन्मानचिन्ह ,मानपत्र, शाल व श्रीफळ देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन श्रीकांत पाटील यांनी केले तर प्रास्ताविक विनोद जाधव यांनी केले आभार प्रदर्शन शंकर भामेरे यांनी केले.
दुसऱ्या सत्रात कथाकथन आणि कवी संमेलन संपन्न झाले यात जवळपास 50 हून अधिक कवी आणि कथाकारांनी आपला सहभाग नोंदविला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *