जामनेर (प्रतिनिधी)- बचत गटाच्या माध्यमातून घेतलेल्या जास्तीत कर्जाचा बचत निधी वापर उद्योग व्यवसायासाठी करावा व आता बचत गटाचे बँकिंग स्वरूपात मार्गक्रमण व्हावे. विविध उपप्रकल्पात सहभाग घेऊन गटाचा व आपल्या कुटुंबाच्या उत्पन्नात वाढ करावी असे मनोगत क्रांती जोती बचत गटाचे मार्गदर्शक श्रीकांत अहिरे सर यांनी व्यक्त केले.
सभेचे अध्यक्षस्थान जितेंद्र गोरे यांनी भुषविले.
आज दि.5/1/2025 रविवारी संध्या. ७:३० वा.
हाॅटेल सद्गुरू, बसस्थानक समोर, जामनेर येथे बचत गटाची वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
यासभे दरम्यान मागील वर्षाचा हिशोब, जमा खर्चास मंजूर देवून कर्ज वाटप मर्यादा 15 ते 20 हजार पर्यंत ठरविण्यात आली. मासिक वर्गणी 1000 व व्याजदर 2% ठेवण्यात आले.
सभासदांनी आपली कागदपत्रे लवकरात लवकर जमा करून बचत गटाचे नवस्वरूप व पुढील वर्षाचे नियोजन याबाबत गटाचे सचिव जितेंद्र गोरे यांनी माहिती दिली.
गटाचे सभासद संदीप महाजन, अमोल देशमुख, रमेश वराडे, श्रीकांत अहिरे, अश्विन रोकडे, लक्ष्मीकांत बेदमूथा, किशोर पाटील, गोपाल राऊत, गणेश चवरे, ईश्वर जंजाळकर, नरेंद्र बर्वे, भगवान माळी, ऋषिकेश पवार, विजय भोपळे, निलेश सपकाळ, योगेश्वर पाटील आदी. उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदीप महाजन यांनी सुत्रसंचलन अश्विन रोकडे तर आभार जितेंद्र गोरे यांनी मानले.
Leave a Reply