जामनेर (प्रतिनिधी)कु. प्रतिक्षा किशोर धनगर, वय वर्ष १८ हि आज दिनांक २१.११.२०२४ रोजी सुमारे १०:३० ते ११:०० वाजेच्या दरम्यान पहुर येथून पाळधी येथे येण्यासाठी पहुर बस स्थानक येथे उभी होती. त्यावेळेस पैठण- जळगाव ही एस टी बस पहुर येथे आली असता माझी मुलगी व इतर विदयार्थीनी बस मध्ये चढत असतांना बस वरील कंडक्टर यांनी कोठे जायचे आहे विचारले व मुलींनी पाळधी सांगितले असता पाळधी येथे बस थांबणार नाही असे सांगून मुलीला धक्का मारून बस खाली ढकलले व बस पुढे मार्गस्थ केली. त्यामुळे कु. प्रतिक्षा मुलगी पाठीवर पडुन तीला डोक्यास व पाठीस मार लागला आहे. त्यावेळी स्थानकावरील इतर गावकऱ्यांनी मुलीला उपचारासाठी पाळधी येथे अॅटोरिक्शा मधुन घेउन आले असता सदर घटना मुलीच्या वडिलांना समजली.पाळधी येथे थांबवण्यास कंडक्टर नकार देत असल्याने मुलींना शाळेत वेळवर पोहचता येत नाही. मुलींचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शासनाने मुलींचे शिक्षणासाठी विविध पासेस सवलती लागु केल्या आहेत. महिला सन्मान योजना लागु केली आहे. परंतु अशा या चालक वाहक कर्मचाऱ्यामुळे मुलींना शिक्षणासाठी प्रवास करीत असतांना अडचणी येत आहेत.
सदरील चालक व वाहक यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी व माझ्या मुलीला न्याय देण्यात यावा. जेणेकरून इतर चालक वाहक असा प्रकार करण्यास धजावणार नाहीत. पाळधी हे गाव संवेदनशिल गाव असुन असा प्रकार पुन्हा झाल्यास गावकऱ्यांकडुन रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
. सदर बस वरील चालक वाहक यांच्या विरोधात कारवाई करण्याबाबत पहुर पोलिस स्टेशन येथे तक्रार दिलेली आहे.सदर चालक वाहक यांचेवर आपल्या खात्यामार्फत कारवाई करण्यात यावी. सदर घटनेमुळे माझी मुलगी घाबरलेली असुन तीला मानसीक धक्का बसला आहे व ती एस टी बसने प्रवास करण्यास घाबरत आहे.तरी
चालक वाहक यांचेवर आपल्या खात्यामार्फत कारवाई करण्यात यावी.या आशयचे निवेदन वजा तक्रार विभाग नियंत्रक जळगांव यांच्या कडे केली आहे.
पैठण जळगाव बस वरील वाहक व चालक यांच्यावर कारवाई होणेबाबत.

Leave a Reply