तब्बल 25 वर्षांनी भरली आठवणीची शाळा.

जामनेर(प्रतिनिधी)तब्बल 25 वर्षांनी भरली आठवणीची शाळा न्यू इंग्लिश स्कूल फत्तेपुर दहावी 1999 ची माजी विद्यार्थी मैत्री सोहळा गेट-टुगेदर जामनेर येथील विशाल लॉन्स येथे मोठ्या उत्साहात पार पडले. तब्बल पंचवीस वर्षानंतर एका वर्गातील सर्व जुने मित्र एकत्र आले.जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. कार्यक्रमामध्ये संगीत खुर्ची, गीत गायन, डान्स असे खूप काही कार्यक्रम झाले.त्यात विशेष म्हणजे जयश्री फिरके आणि रमाई लोखंडे यांनी प्रत्येक विद्यार्थ्याला सुरेख अशा भेटवस्तू दिल्या. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद दिसत होता.तसेच कार्यक्रमात देश सेवेसाठी आपल्या जीवाची पर्वा न करता देश सेवा करून निवृत्त झालेल्या माजी सैनिकांचाही सत्कार करण्यात आला. योगायोगाने वर्ग मित्र चेतन पाटील यांचा वाढदिवस ही साजरा करण्यात आला.सर्वांनी स्नेहभजनाचा मनमुराद आनंद घेतला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणी या सर्वांनी खूप परिश्रम घेतले. विशेष स्थानिक जामनेरच्या विद्यार्थ्यांनी डॉ. रमेश पाटील, डॉ. राजेश नाईक, डॉ पराग चौधरी, दिपक वरांगणे, विक्रम चौधरी,जितू पाटील, सुनील जाधव, नरेश जयस्वाल, प्रशांत पाटील,पंकज चौपडे, महेंद्र लोखंडे, संतोष घुले, रमाई लोखंडे सुषमा जैन,स्वाती पाटील यांनी मैत्री सोहळा यशस्वीतेसाठी खूप परिश्रम घेतले. शेवटी सोनबर्डी वर कार्यक्रमाचा समारोप झाला. त्यावेळेस अनेकांच्या डोळ्यांत अश्रू अनावर झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *