राष्ट्रीय ग्राहक दिन तहसील कार्यालयात उत्साहात साजरा.

जामनेर (प्रल्हाद सोनवणे )भारतात दरवर्षी 24 डिसेंबरला ‘राष्ट्रीय ग्राहक दिन’ साजरा केला जातो. 1986मध्ये आजच्याच दिवशी ग्राहक संरक्षण कायदा तयार करण्यात आला. तर, सन 1991 आणि 1993मध्ये या कायद्यात सुधारणा करण्यात आली. या कायद्याचा जास्तीत जास्त वापर केला जावा म्हणून डिसेंबर 2002मध्ये पुन्हा या कायद्यात दुरुस्तीकरण्यात आली
यानंतर 15 मार्च 2003पासून या कायद्याच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली. तथापि, या कायद्यातसुद्धा 1987मध्ये सुधारणा करण्यात आली होती. परंतु, 5 मार्च 2004 रोजी याची संपूर्ण अधिसूचना देण्यात आली.
2000मध्ये प्रथमच राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यात आला होता. आजच्या दिवशी ग्राहकांना त्यांच्या अधिकारांची माहिती मिळावी आणि ते याबाबत जागरूक व्हावेत यासाठी अनेक उपक्रम राबवले जातात. तर, दरवर्षी 15 मार्च रोजी जागतिक ग्राहक हक्क दिन साजरा केला जातो.
केंद्र सरकारने यावर्षी जुलैमध्ये ग्राहक संरक्षण कायदा 2019अंतर्गत नवीन ई-कॉमर्स नियम लागू केले आहेत. वास्तविक, ऑनलाईन शॉपिंगच्या ट्रेंडमुळे हे बदल केले गेले आहेत. ऑनलाईन खरेदी प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात फसवणूकीच्या तक्रारी समोर येत आहेत. हे नवीन नियम अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट, स्नॅपडील सारख्या ई-कॉमर्स साईटवरही लागू होतील. त्यात ई-कॉमर्स साईटसाठी अनेक कठोर तरतुदी करण्यात आल्या आहेत. नवीन नियमांनुसार बनावट व भेसळयुक्त वस्तू विकणाऱ्यास जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते.
ग्राहकांना त्यांचा हक्क मिळावा यासाठी हा कायदा अंमलात आला आहे. या कायद्यांतर्गत कोणताही ग्राहक कोणत्याही प्रकारच्या अन्यायकारक व्यापाराची तक्रार करू शकतो, ज्यासाठी त्यांना पूर्ण अधिकार देण्यात आले आहेत. पूर्वीच्या काळातील व्यापारांच्या व्यवहाराची हाताळणी लक्षात घेऊनच हा कायदा लागू करण्यात आला होता.
हे आहेत ग्राहकांचे मुख्य अधिकार
– सुरक्षिततेचा अधिकार

– माहितीचा अधिकार

– निवड करण्याचा अधिकार

– समस्या निराकरण करण्याचा अधिकार

– ग्राहक शिक्षणाचा अधिकार

व्यापाऱ्यांची हेराफेरी
एक नागरिक म्हणून, राज्यघटनेने आपल्याला नागरिकत्वाचे हक्क दिले तसेच, ग्राहक म्हणूनही आपल्याला काही अधिकार देण्यात आले आहेत. त्यातील पहिला आणि सर्वात मोठा हक्क म्हणजे ग्राहकांना दिलेल्या किंमतीच्या समान वस्तू त्यांना मिळाली पाहिजे.
आज २४ डिसेंबर, २०२४ रोजी ३८वा राष्ट्रीय ग्राहक दिन विविध कार्यक्रमांनी साजरा होत आहे. त्या निमित्ताने जामनेर तहसील कार्यालयात तहसीलदार नानासाहेब आगळे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच ग्राहक पंचायत चे जिल्हा संघटक प्रल्हाद सोनवणे तालुकाध्यक्ष डॉक्टर उमाकांत पाटील यांच्या उपस्थितीत ग्राहक दिन साजरा करण्यात आला. यावेळी पुरवठा निरीक्षक श्री सुर्वे यांनी उपस्थित यांचे स्वागत केले प्रास्ताविक राजेंद्र देशपांडे यांनी केले तर आभार सुनील कुलकर्णी यांनी मानले या वेळी ग्राहकांच्या वतीने मुसा पटेल, रउप शेख यांनी ग्राहकांच्या समस्या मांडल्या तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी ग्राहकांचे अधिकार व कर्तव्य याविषयी मार्गदर्शन केले याप्रसंगी अधिकारी पदाधिकारी व ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *