जामनेर (प्रतिनिधी):- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या टीमचे खाते वाटप जाहीर झाले असून जिल्ह्यातील ना.गिरीश महाजन , ना.गुलाबराव पाटील, ना.संजय सावकारे या तिघही कॅबीनेट मंत्र्यांना मोठे खाते मिळाले आहे .तिघही मंत्र्यांचे आप आपल्या मतदार संघात मोठ्या थाटात स्वागत करण्यात आले.ना. गिरीश भाऊ महाजन यांचे जामनेर नगरीत जोरदार भव्य – दिव्य स्वागत करण्यात आले असून कार्यकर्ते दुपारी २ वाजेपासून गिरीश भाऊ महाजन यांच्या आगमनाची वाट पहात होते. शेवटी संध्या.६:३० वाजेला त्यांचे आगमन जामनेरात झाले. आय टी आय जळगांव रोड येथून ना. गिरीश भाऊ महाजन यांची वाजत गाजत भव्य दिव्य अशी स्वागत मिरवणूक काढण्यात आली सोबत फटक्यांची आतिषबाजी करण्यात आली. स्वागत मिरवणुकीत लाडक्या बहिणींनी ना.गिरीश भाऊ महाजन यांचे औक्षण करून त्यांना शुभेच्छा दिल्या.मिरवणूक डॉ. बाबसाहेब आंबेडकर चौकात आल्या नंतर मंत्री महोदयांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला व पुढे राजमाता जिजाऊ चौकात जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून स्वागत मिरवणुकीची सांगता झाली.
मा.ना.गिरीश भाऊ महाजन यांचे जामनेर नगरीत भव्य स्वागत.

Leave a Reply