जामनेर (प्रतिनिधी)आज दि. १५.०९.२०२५ रोजी जामनेर तहसील कार्यालय येथे तालुकास्तरीय लोकशाही दिन उत्साहात पार पडला. महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी आयोजित केला जाणारा हा दिवस नागरिकांच्या समस्या व तक्रारींवर तात्काळ सुनावणी व निराकरण करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरतो.नागरिकांच्या तक्रारींची सुनावणी लोकशाही दिनानिमित्त तहसीलदार जामनेर यांच्या अध्यक्षतेखाली विविध विभाग प्रमुखांची उपस्थितीत नागरिकांकडून आलेल्या तक्रारी व समस्या ऐकून घेण्यात आल्या.
यामध्ये महसूल, पंचायत राज, कृषी, पोलीस, आरोग्य, महिला व बालकल्याण, समाजकल्याण, सार्वजनिक बांधकाम, पाणीपुरवठा इत्यादी विभागांचे अधिकारी उपस्थित होते.संक्षिप्त चौकशी व कार्यवाही प्रत्येक तक्रारीवर संबंधित विभाग प्रमुखांनी थेट नागरिकांशी संवाद साधत संक्षिप्त चौकशी करून आवश्यक ती कार्यवाही केली. काही प्रकरणांवर तात्काळ निर्णय घेण्यात आले तर काही प्रकरणांवर निश्चित कालमर्यादा ठरवून त्यांचे निराकरण करण्याबाबत आदेश देण्यात आले.
लोकशाही दिनाचे महत्व
लोकशाही दिनामुळे सामान्य नागरिकांना त्यांच्या प्रश्नांसाठी प्रत्येक विभाग प्रमुखांशी एकाच व्यासपीठावर संवाद साधण्याची संधी मिळते. या माध्यमातून शासन सेवा अधिक वेगवान, पारदर्शक व जनसामान्यांच्या दारी पोहोचविण्याचे काम प्रभावीपणे होत असल्याचे मत तहसीलदार जामनेर यांनी व्यक्त केले.या प्रसंगी तहसीलदार नानासाहेब आगळे, नायब तहसीलदार राजेंद्र कुंभार सतीश इंगळे शिवदे मॅडम नारायण सुर्वे , मंडळ अधिकारी, ग्रामसेवक, पंचायत समिती अधिकारी, पोलीस विभागाचे अधिकारी तसेच सर्व विभाग प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरिकांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत शासनाच्या उपक्रमाचे स्वागत केले.
Leave a Reply