जामनेर(प्रतिनिधी)क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे आणि जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षण विभाग, जामनेर आणि ज्ञानगंगा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय व एकलव्य विद्यालय, जामनेर यांच्या वतीने हॉकीचे महान खेळाडू मेजर ध्यानचंद यांच्या जयंती निमित्त “जामनेर तालुकास्तरीय भव्य मॅरेथॉन स्पर्धा-२०२५” चे आयोजन जलसंपदा आपत्ती व्यवस्थापन मंत्री ना. गिरीश भाऊ महाजन यांच्या सौजन्याने करण्यात आले.
त्यावेळी हॉकीचे महान खेळाडू मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी मॅरेथॉन स्पर्धा छत्रपती शिवाजी चौकातून सुरू झाली.
या मॅरेथॉन स्पर्धेत १७ वर्षांखालील मुले (५ किमी), १७ वर्षांखालील मुली (३ किमी), खुला गट पुरुष (५ किमी) आणि खुला गट महिला (३ किमी) अशा विविध गटांमध्ये स्पर्धकांनी सहभाग घेतला. या स्पर्धेला जामनेरमधील क्रीडाप्रेमींनी मोठा प्रतिसाद दिला.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे जळगाव जिल्हाध्यक्ष श्री. चंद्रकांत बाविस्कर, श्री. जे. के. चव्हाण, तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव श्री. जितू भाऊ पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी श्री. संजय पाटील, सिनेट सदस्य श्री दीपक पाटील, ज्ञानगंगा विद्यालयाचे प्राचार्य श्री. राजेंद्र सोनवणे, एकलव्य विद्यालयाचे मुख्याध्यापक देवीदास काळे, आणि तालुका क्रीडा समन्वयक आसिफ सर उपस्थित होते.
या स्पर्धेचे पंच म्हणून क्रीडाशिक्षक विलास पाटील, जी. सी. पाटील, समीर घोडेस्वार, पी. डी. पाटील, दीपक चौधरी, योगेश बावस्कर, प्रेमदत्त खोडपे, देवा सर, तुरे सर आणि विनोद माळी,अनिल देशमुख,स्नेहल पाटील, शितल पाटील नेहा राजपूत,यांनी जबाबदारी सांभाळली. त्यांनी अत्यंत चोखपणे स्पर्धेचे नियमन केले. शेवटी विजयी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी पुष्पगुच्छ व बक्षीस देऊन गौरविण्यात करण्यात आले.
ही मॅरेथॉन स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ज्ञानगंगा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आणि एकलव्य विद्यालयाने विशेष परिश्रम घेतले.
Leave a Reply