जामनेर(प्रतिनिधी)संविधानाची विटंबना झाल्याने परभणी शहरात अंबेडकरी जनतेने निषेध आंदोलन केले. यामध्ये पोलीसांनी बळाचा वापर करून आंदोलकांवर अमानुष लाठीचार्ज करून त्यांना अटक करण्यात आली. यामध्ये सोमनाथ सुर्यवंशी या तरूण भिमसैनीकाचा समावेश होता. पोलीस कस्टडीमध्ये असतांना पोलीसांच्या अमानुष मारहाणीमुळे कस्टडी मध्ये त्याचा मृत्यु झाला यात जे पोलीस अधिकारी असतील त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी. व विटंबने मागील खरा सुत्रधाराला शोधून त्या देशद्रोहाचे गुन्हे दाखल करून अटक करण्यात यावी.तसेच फत्तेपूर पोलीस स्टेशन अंतर्गत बौध्दावर होणारे अन्याय दिवसे दिवस आत्याचाराचे प्रमाण वाढत चालले असून फत्तेपूर मधील पोलीस अधिकारी व कर्मचारी हे दोन नंबरचे पैसे वसुल करण्यात दंग आहे. त्यात मग सट्टा, पत्ता, दारू, अशा प्रकारचे अवैध धंदे जोरात चालु आहे. रांजणी या गावात बौध्द महिलांवर गावातील जातीयवादी गावगुंडाकडून मारहाण करण्यात आली, किन्ही या गावात बौध्द महिलेचा मृत्यु झाला. त्यात गावातील गावगुंडांनी अंतीमसंस्काराच्या वेळेस अडसर निर्माण
करून प्रेताची अवहेलना करण्यात आली अशा प्रकारे बऱ्याच प्रमाणात बौध्द समाजावर अन्याय अत्याचार चालु आहे. त्यात फत्तेपूर पोलीस अधिकारी बौध्दाच्या संरक्षणात कमी पडतांना दिसत आहे. संबंधीत पोलीस अधिकाऱ्यावर मा. पोलीस अधिक्षक यांनी दखल घेवुन योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी. तसेच
वरील बाबींचा निषेध करण्यासाठी दि.१९/१२/२०२४ वार गुरूवार रोजी दु.१ वाजता
डॉ. बाबसाहेब आंबेडकर चौक, जामनेर येथे रास्ता रोका करण्यात आले तसेच तहसील कार्यालयात तहसीलदार नानासाहेब बागडे यांना निवेदन देण्यात आले या निवेदनातील मागण्या माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे तसेच शासनाकडे पाठवण्यात येतील असे आश्वासन तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी यावेळी मोर्चाकरांना दिले. यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष भगवान सोनवणे यांनी गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल केलेल्या वक्तव्याचा संतप्त भावना व्यक्त करीत जाहीर निषेध केला.या वेळी भगवान सोनवणे आर.पी.आय. जिल्हाअध्यक्ष, जळगांव, शहर अध्यक्ष बबलु लोखंडे सुपडू मेढे यादव सुरवाडे प्रदीप इंगळे मोहन दामोदर अलोसर तडवी अर्जुन रामोसे धनराज सोनवणे संपत दामोदर गजमल रामोसे पंडित शिंदे सुनंदा सुरवाडे कल्पना सुरवाडे अनिता सुरवाडे राजू सुरवाडे महेश खरे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संविधानाची विटंबना प्रकरणी जामनेरात रास्ता रोको व तीव्र आंदोलन.

Leave a Reply