जामनेर तालुका – महसूल सप्ताह 2025 छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिरात नागरिकांची उत्स्फूर्त उपस्थिती

जामनेर (प्रतिनिधी)जामनेर तालुक्यातील महसूल सप्ताहानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर दिनांक 04 ऑगस्ट 2025 रोजी  तहसीलदार नानासाहेब आगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पाळधी येथे माळी समाज मंगल कार्यालयात उत्साहात पार पडले. महसूल मंडळ पाळधी व स्थानिक प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शिबिरात विविध शासकीय योजनांचे लाभ थेट नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आले.

या शिबिरात एकूण १०५८ नागरिकांना विविध सेवा व लाभ देण्यात आले. यामध्ये –
• संजय गांधी योजना (DBT) लाभार्थी – 78
• ॲग्रीस्टॅक योजना – 22
• तालुका कृषी अधिकारी कार्यालय सेवा – 48
• मंडळ अधिकारी व तलाठी मार्फत सेवा (अपाक शेरा कमी, पोख आदेश, तगाई इत्यादी) – 49
• जिवंत 7/12 उतारे – 218
• पुरवठा शाखा – शिधापत्रिका लाभ – 208


• सेतू केंद्रमार्फत दाखले –
• उत्पन्न दाखले – 333
• जातीचे दाखले – 74
• वय, अधिवास व रहिवास दाखले – 28

यावेळी नागरिकांना तात्काळ दाखले व प्रमाणपत्रे देत, महसूल विभागाच्या सेवांबद्दल जागरूकता निर्माण करण्यात आली. नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत करत, महसूल विभागाचे कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *