जामनेर तालुक्यात किशोर वयीन मुला मुलींसाठी आरोग्य शिबिर पीअर एज्युकेटर्स यांना भेट वस्तूंचे वाटप

जामनेर (प्रतिनिधी)जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायेकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक आरोग्य केंद्र नेरी येथे राष्ट्रीय किशोर स्वाथ कार्यक्रमांतर्गत किशोर वयीन मुला मुलींना किशोर वयात येणाऱ्या समस्या वयामध्ये होणारे बदल तसेच सुयोग्य आहार याबाबत सविस्तर मागदर्शन करण्यात आले तसेच पीएर एज्युकेटर्स यांना भेट वस्तूंचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश सोनवणे तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.कोमल देसले व राष्ट्रीय किशोर स्वास्थ कार्यक्रमाच्या समन्वयक वैशाली अहिरे उपस्थित होत्या.


सदर प्रसंगी डॉ.सोनवणे व डॉ.देसले यांनी उपस्थित किशोर वयीन मुला मुलींना आरोग्याबाबत सविस्तर मागदर्शन केले.तसेच उपस्थित आशा स्वयंसेविका यांचे कापूस उत्पादक शेतकरी शेतमजूर व गरोदर माता यांच्या घ्यावयाच्या काळजीबाबत सविस्तर मागदर्शन केले. सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मुला मुलींना भेटवस्तूचे वाटप करण्यात आले.


कार्यक्रम प्रसंगी डॉ.कांचन गायकवाड,डॉ.गिरीष पाटील,डॉ.नामदेव पाटील,आरोग्य निरीक्षक श्री सोपान राठोड, आरोग्य सहाय्यिका जयश्री कुलकर्णी औषध निर्माता श्री पंकज इंगळे आरोग्य सेवक रविंद्र सुर्यवंशी, संदीप सावकारे, गणेश पाटील, कृष्णा बाबर, गणेश शिंदे, पंकज गणवीर, आरोग्य सेविका रत्नकला उशीर,शीतल रोकडे, शिपाई जितेंद्र नाईक, गटप्रवर्तक निलिमा गवळी, माया बोरसे,व सर्व आशा स्वयंसेविका तसेच किशोर वयीन मुले मुली मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *