जामनेर (प्रतिनिधी)आज एकुलती बु, ता जामनेर येथे मराठा सेवा संघ जामनेर यांचेतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व समाज प्रबोधनपर कार्यक्रम घेण्यात आला. सुरुवातील राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि सावित्रीबाई फुलेंच्या प्रतिमेचे गावातील नागरिकांच्या हस्ते पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. प्रथम गावातील 10 वी आणि 12 वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी विद्यार्थ्यांना वाचनाची प्रेरणा मिळावी म्हणून “गीतजागर” व “मराठा सेवा संघाने समाजाला काय दिले” ही पुस्तके भेट म्हणून देण्यात आले. याप्रसंगी इयत्ता 7 वी मधील नीरज वारंगणे याने आपले मनोगत व्यक्त केले.
मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष शिवश्री दिपक ढोणी सर यांनी उपस्थित गुणवंत विद्यार्थी व पालकांना प्रबोधनपर मार्गदर्शन केले. यात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जाज्वल्य इतिहासाच्या विकृतीकरणाचे आपण साक्षीदार होत असून महाराजांचे आरतीच्या माध्यमातून होणारे दैवतीकरण थांबवण्याबाबत उपस्थिताना कळकळीचे आवाहन केले. याप्रसंगी गावातील इयत्ता 10 वी मधील खुशी चंद्रशेखर पाटील, विद्या दादाभाऊ ब्राह्मणे, विपुल प्रदीप पाटील, लोकेश ज्ञानेश्वर ठाकरे, शिवचरण समाधान सोनवणे, वैभव सोपान पाटील, सागर गोपाल पाटील आणि रवींद्र संजय पाटील यांचा तर इयत्ता 12 वीतील शिवानी संजय पाटील, अजय गजानन सकट, गोकुळ अशोक जाधव, आदित्य अभिमान कोळी, हर्ष श्रीराम लोखंडे, गौरव दत्तू पाटील, शुभम बापू कोळी, मोहिनी समाधान सोनवणे, दिपक अनील पाटील, ऋषिकेश कैलास पाटील आणि हर्षदा अरुण पाटील यांचा पुष्पगुच्छ व पुस्तके देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठा सेवा संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष शिवश्री योगेश पाटील सर यांनी केले तर शिवश्री दिपक पाटील सर यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमासाठी गावातील नागरिकांसह महिलांची विशेष उपस्थिती होती.
*दोंदवाडे येथील गुणवंत विद्यार्थी*
याप्रसंगी गावातील इयत्ता 10 वी मधील ओम विजय पाटील,
मानसी निलेश शिंदे, ओम योगेश पाटील, श्रद्धा विनोद परदेशी, कृष्णा राजेंद्र बडगुजर, भावना नामदेव पाटील, वेदांत कृष्णा हावळे, स्नेहा सुनील पाटील, शिवम ज्ञानेश्वर बडगुजर, वैशाली सुरेश परदेशी, माया रंजीत परदेशी, जयेश मदन परदेशी, उमेश सुपडू पाटील, हर्षवर्धन समाधान पाटील, महेश संतोष लोहार तर 12 वी तील नितीन बापू पाटील, राज गजानन बडगुजर, करण सुपडू बडगुजर, देवेश सुपडू कोळी, रितेश प्रदीप पाटील, विपुल संदीप बडगुजर, कल्याणी संतोष लोहार, सोनाली ईश्वर बडगुजर आणि पल्लवी योगेश पाटील यांचा पुष्पगुच्छ व पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला.
Leave a Reply