जामनेर (प्रतिनिधी)अनेक दिवसांपासून भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार याबाबत मोठे उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले होते. आज पक्षाच्या प्रदेश पातळीवरून याबाबतची घोषणा करण्यात आली आहे. यात पूर्व विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी जामनेर येथील भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्ते माजी तालुकाध्यक्ष शेतकरी सहकारी संघाचे चेअरमन चंद्रकांत रामधन बाविस्कर यांची निवड करण्यात चंद्रकांत बाविस्कर यांनी जामनेर तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी समर्थपणे अनेक वर्षांपासून सांभाळली यामुळे त्यांच्यावर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
त्यांच्या निवडीबद्दल जलसंपदा तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री माननीय नामदार गिरीश महाजन जामनेर नगरीच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ साधनाताई महाजन शिक्षण संस्थेचे सचिव जितेंद्र पाटील भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते ऍड शिवाजी नाना सोनार जे के चव्हाण श्री राम महाजन माजी गटनेते डॉ प्रशांत भोंडे माजी उपनगराध्यक्ष प्रा शरद पाटील मंडळ प्रमुख रवींद्र झाल्टे दीपक तायडे जामनेर तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी भारतीय जनता पार्टीच्या पूर्व जिल्हाध्यक्षपदी चंद्रकांत बाविस्कर यांची निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले आहे.
Leave a Reply