जामनेर(प्रतिनिधी)जामनेर तालुक्यातील महसूल मंडळ नेरी अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज राजस्व समाधान शिबिर ग्रामपंचायत नेरी दिगर येथील महादेव मंदिर सभामंडपात उत्साहात व व्यापक प्रतिसादात संपन्न झाले.या शिबिरास मा. जिल्हाधिकारी जळगाव आयुष प्रसाद, मा.मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद जळगाव श्रीमती मीनल करनवाल, मा.उपविभागीय अधिकारी जळगाव विनय गोसावी, तसेच सर्व विभागांचे तालुका प्रमुख यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
शिबिराच्या प्रारंभी मा. उपविभागीय अधिकारी विनय गोसावी यांनी प्रास्ताविक करून शिबिराचे उद्दिष्ट,गरज व उपयुक्तता विषद केली.
मा.जिल्हाधिकारी डॉ.आयुष प्रसाद यांनी आपल्या मनोगतात म्हटले की“राजस्व समाधान शिबिरे ही केवळ सेवा पुरविण्याची प्रक्रिया नसून, शासन व जनतेमधील दुवा सशक्त करण्याचे प्रभावी माध्यम आहे.सर्व विभागांनी एकत्र येऊन नागरिकांना विविध योजना एका ठिकाणी देणे ही सुशासनाची दिशा आहे. प्रत्येक पात्र नागरिकाने शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा.”
मा.मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मीनल करनवाल यांनी आपल्या भाषणात नमूद केले की:“ग्रामस्तरावर राबविण्यात येणाऱ्या शिबिरांमुळे विविध कल्याणकारी योजना थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचतात. महिलांसाठी, शेतकऱ्यांसाठी, वृद्ध व बालकल्याणासाठी राबवलेल्या योजनांची अंमलबजावणी कृतीशील स्वरूपात होणे हीच अशा उपक्रमांची खरी फलश्रुती आहे.”
शिबिरादरम्यान दिले गेलेले विभागनिहाय लाभ संजय गांधी निराधार योजना (DBT प्रक्रिया) –230 लाभार्थी,ॲग्रीस्टॅक – 05, कृषी विभाग सेवा (तालुका कृषी अधिकारी कार्यालय) – 70, प्रधानमंत्री किसान सन्मान योजना – 18 लाभार्थी, कृषी यांत्रिकीकरण (ट्रॅक्टर अनुदान) – 02 लाभार्थी, ठिबक सिंचन (PMKSY योजना) – 02 लाभार्थी, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना – 01 लाभार्थी, शिधापत्रिका वाटप (पुरवठा विभाग) – 82 लाभार्थी, प्राथमिक आरोग्य तपासणी (PHC) – 410 नागरिक,
गर्भवती माता बेबी केअर किट वाटप – 02 लाभार्थी, माझी कन्या भाग्यश्री योजना (₹२५,०००) – 01 लाभार्थी, सेतू केंद्रामार्फत प्रमाणपत्र वितरण, उत्पन्न प्रमाणपत्र – 30, जात प्रमाणपत्र – 48,वय, अधिवास व रहिवास प्रमाणपत्र – 38,मनरेगा अंतर्गत जॉब कार्ड वाटप (ग्रामपंचायत विभाग) – 09,
लेक लाडकी योजना – 29 लाभार्थी, हिंदू समाज स्मशानभूमीसाठी 30 आर शासकीय जागेचे (गट क्र. 293 व 315, नेरी दिगर) वाटप करण्यात आले.एकूण विभागनिहाय लाभार्थ्यांची संख्या – ९७७ कार्यक्रमाची सांगता जामनेर तालुका तहसीलदार नानासाहेब आगळे यांच्या मनोगत व आभार प्रदर्शनाने झाली. त्यांनी उपस्थित मान्यवर, विभागप्रमुख,
कर्मचारी आणि लाभार्थ्यांचे आभार मानून यशस्वी शिबिरासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे अभिनंदन केले.शिबिराचे यश हे प्रशासन व नागरिक यांच्यातील संवाद, समन्वय व विश्वासाचे उत्तम उदाहरण ठरले असून, भविष्यातील अशा उपक्रमांना अधिक व्यापक स्वरूप देण्यात येईल, असे प्रशासनाकडून आश्वस्त करण्यात आले.
फोटो ओळ शिबिरार्थी समोर मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी श्री आयुष प्रसाद व शिबिरार्थी
शिबिरात लाभ घेणाऱ्या लाभार्थ्या व . जिल्हाधिकारी आयुष प्रसाद,मा.मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद श्रीमती मीनल करनवाल,मा.उपविभागीय अधिकारी विनय गोसावी, तहसीलदार नानासाहेब आकडे यांच्यासह अधिकारी पदाधिकारी शिबिरार्थी.
Leave a Reply