जिल्हयाच्या सहकारच्या राजकारणात पहूर येथील रहिवाशी अरविंद देशमुख यांनी उत्तुंग भरारी

जामनेर (प्रतिनिधी)जळगाव जिल्हयाच्या सहकारच्या राजकारणात पहूर येथील रहिवाशी अरविंद देशमुख यांनी उत्तुंग भरारी घेतली असून जिल्हा दुध संघ पाठोपाठ त्यांची जळगाव जिल्हा कृषी औद्योगिक संघच्या संचालकपदी एकमताने बिनविरोध निवड झाली आहे.अरविंद भगवान देशमुख हे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहेत तसेच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचेविश्वासू कार्यकर्ते तसेच आरोग्य दूत म्हणून त्यांची ओळख आहे. सहकारच्या राजकारणात पहिले पाऊल दुध संघाच्या माध्यमातून टाकले त्यानंतर अनेक सहकारी संस्थावर निवड झाली आता जिल्हयाची महत्वपूर्ण असलेली कृषी औद्योगिक संस्थेवर अरविंद देशमुख यांची निवड झाली आहे ते नाशिक येथील नामको बँकेचे संचालक आहे. तसेच जिल्हा दूध संघाचे संचालक असून आरोग्यदूत म्हणून त्यांनी जिल्ह्यात काम केले आहे. शुक्रवारी झालेल्या बैठकीत सर्व संचालकांच्या व सभासदांच्या समोर ही निवड झाली. निवडीनंतर भाजपचे जिल्हाध्यक्ष ह.भ.प.जळकेकर महाराज, रोहित निकम, जिल्हा बँकेचे संचालक संजय पवार, विष्णू भंगाळे, पितांबर भावसार, आरोग्यदूत शिवाजी पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन देशमुख यांचे स्वागत केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *