मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे मारेकरी वाल्मिक कराड सह सर्व आरोपींना फाशी देण्यात यावी.

जामनेर (प्रतिनिधी)आज जामनेर तालुका शिवसेनेच्या वतीने जामनेर पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांना निवेदन देण्यात आले बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे मारेकरी वाल्मिक कराड सह सर्व आरोपींना फाशी देण्यात यावी.शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन  यांच्या आदेशानुसार शिवसेना जामनेर तालुक्याच्या वतीने बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन तीन महिने पूर्ण झाली आहे हत्तेतील  सर्व आरोपींना अटक झाली असून त्यांचा फास्टट्रॅक न्यायालयात खटला चालवावा. यामध्ये आरोपींची विकृत मानसिकता दर्शविणारे फोटो समोर आले असून, सदर फोटो बघून समाज मन सुन्न झाले आहे. अशा नराधमास आरोपींना गाठलेली कृरतेची परिसीमा राहिलेली नाही,यातील वाल्मीक कराड व सर्व आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी. त्यासाठी जामनेर तालुक्यातील सर्व शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या भावना तीव्र असल्याने वरिष्ठ पातळीवर वर दखल घ्यावी व त्यांना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी निवेदनाद्वारे शिवसेना वतीने देण्यात आली आहे. निवेदन देते वेळी अतुल सोनवणे उप जिल्हा प्रमुख ,अँड भरत पवार शिवसेना तालुका प्रमुख,नरेंद्र धुमाळ शहर प्रमुख, प्रवीण ठाकरे तालुका संघटक, सचिन सोनार , खुशाल पवार, नितीन राजुरकर, सुरेश चव्हाण, कुष्णा सोनार, अनिल पिठोडे, दिपक डिवरे, यादी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *