जामनेर(प्रतिनिधी)शेतकरी, शेतातील पिकं आणि गाव, जमिनीचे नकाशांचं आता डिजिटलीकरण करण्यात येणार आहे. केंद्र सरकारची ॲग्रिस्टॅक योजना राज्य सरकारने राबवण्याचा निर्णय १० ऑक्टोबर रोजी मंत्रिमंडळ बैठकीत घेतला आहे. कृषी क्षेत्रातील सेवांचा वापर करून सरकारी योजनांचा जलदगतीनं आणि परिणामकारक लाभ देणं सोप्पं व्हावं, यासाठी योजना राबवण्यात येत असल्याचा शासननिर्णय सोमवारी (ता.१४) प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यामुळे शेतीच्या डिजिटलीकरणाची गती वाढवण्याचे संकेत दिले आहेत. केंद्र सरकारने याबाबत ११ जुलै २०२३ रोजी राज्य सरकारसोबत करार केलेला आहे.या योजनेतून प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या व शेतांची आधार संलग्न माहिती संच (फार्मर रजिस्ट्री) शेतकऱ्यांच्या शेतातील हंगामी पिकांची माहिती संच (क्रॉप सोन रजिस्ट्री) आणि शेतांचे भु संदर्भीकृत (जिओ रेफरन्स लँड पार्सल) यांचा माहिती संच एकत्रितरित्या तयार करण्यात येणार आहे. त्यातून शेतकऱ्यांना स्वस्त कर्ज, उच्च-गुणवत्तेची कृषी निविष्ठा, बाजारपेठीय नेटवर्क आणि स्थानिक आणि विशिष्ट तज्ञ मार्गदर्शही या योजनेतून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यातून केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांची अंमलबजावणी वेळेवर आणि पारदर्शक होईल, असा दावाही केंद्र-राज्य सरकारकडून करण्यात आला आहे.पीएम किसान योजनेतून प्राप्त करण्यासाठी आवश्यकतेच्या अटी पूर्ण करण लाभ शेतकऱ्यांना सुलभ पद्धतीनं मिळेल. पात्र शेतकऱ्यांना लाभ देण्यात येईल. तसेच किसान क्रेडिट कार्ड आणि कृषी इन्फ्रा फंड आणि शेतीच्या विकासासाठी कर्ज उपलब्ध करून देणं सोप्पं होईल. त्याचबरोबर पिक विमा, आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत शेतकऱ्यांची नुकसान भरपाईसाठी पंचनामे सुलभ पद्धतीनं करण्यात येतील.
तर किमान आधारभुत किंमत (हमीभाव) खरेदीमध्ये शेतकऱ्यांचे नोंदणीकरण ऑनलाईन पध्दतीने करता येणार आहे. तसेच कृषी कर्ज, वित्त पुरवठा, निविष्ठा आणि इतर सेवा देणाऱ्या यंत्रणांना कृषी सेवा सहजपणे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी कृषी व संलग्न विभागाकडे शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती उपलब्ध असणार आहे. त्यामुळे वारंवार शेतकऱ्यांना सरकारी कार्यालयाचे खेटे मारावे लागणार नाहीत.तहसीलदार नानासाहेब आगळे यांची तळेगाव येथे ॲग्रीस्टॅक नोंदणी संदर्भात सी.एस.सी सेंटरला भेट देऊन व शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जामनेर तालुक्यात 80 हजार शेतकरी बांधव असून सर्वच शेतकरी बांधवांनी आपले आधार सातबाऱ्याशी लिंक करावे असे आवाहन तहसीलदार श्री नानासाहेब आगळे यांनी केले आहे.
Leave a Reply