७० वर्षाची परंपरा जोपासत श्रीराम पेठेत बारागाड्या उत्साहात साजर्‍या.


जामनेर /प्रतिनिधी – आपले सण आपले उत्सव आपणचं साजरे करणार या ब्रिद वाक्याखाली पारंपरिक पद्धतीने सालाबादाप्रमाणे यावर्षी सुद्धा भव्य दिव्य बारागाड्या उत्सव शहरातील श्रीराम पेठ भागातील दसरा मैदान ते हनुमान मंदिरात पर्यंत ओढल्या गेल्या स्व. देवचंदबाबा शिंदे यांच्या प्रेरणेने सुरु केलेल्या बारागाड्या उत्सवाला आज सुमारे ७० वर्षाची परंपरा लाभली आहे. सविस्तर माहिती अशी श्रीराम पेठ भागात असलेले श्रीराम पेठ वासियांचे ग्रामदैवत तथा आराध्य दैवत असलेले खंडेराव महाराज यांच्या नावाने या भागात बारागाड्या ओढल्या जातात.

या उत्सवास आज ७० वर्षाची परंपरा लाभली आहे सामाजिक एकात्मता हिच श्रीराम पेठ वासियांची ओळख असल्याने हा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो. सद्ध्या तरी या बारागाड्या उत्सव काठीचा मान हा शिंदे परीवारा कडे असुन श्रीराम पेठ भागातील रहिवाश्यांकडुन तसेच शिंदे परीवारातील सदस्यांनी हा पारंपरिक व पुरातन वारसा कायम ठेवला आहे. दसरा मैदान ते हनुमान मंदिरात पर्यंत या बारागाड्या ओढल्या जातात तर पंचक्रोशीतील हजारोंच्या संख्येने भाविक या उत्स्वात हजारोंच्या संख्येने सहभागी होत सोहळा साजरा करतात तर “खंडेराव महाराज की जय” तर “येळकोट येळकोट जय मल्हार” या घोषणांनी आसमान दणाणून सोडला जातो. आज जरी श्रीराम पेठ भागातील रहिवासी शहराच्या अन्य भागात विखुरलेले असले तरी आजच्या दिवशी लहान पासुन ते वयोवृद्ध व्यक्ती तसेच महिला आवर्जून मोठ्या संख्येने उपस्थित होतात. आज इंटरनेट युगात सुद्धा हि परंपरा टिकवून ठेवल्याचा आनंद आहे असा विश्वास श्रीराम पेठ भागातील रहिवासी मान्य करतात. त्यामुळे हिच सामाजिक एकता शहरात कुतुहलाचे मुख्य कारण ठरले आहे हा भव्य दिव्य सोहळा मोबाईलच्या कॅमेर्‍यात भाविकांनी कैद केला. खोबरे भंडाऱ्याची उधळण करुन मोठ्या धार्मिक वातावरणात नियोजित भक्तां करवी बारागाड्या ओढल्या जातात तर बारागाड्या ओढल्या नंतर उडीद व भाकर भंडाऱ्याची तथा महाप्रसादाचा लाभ भाविक घेत असतात या महाप्रसाद वाटपासाठी खंडेराव महाराज सेवा समिती कार्यान्वित असते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *