चोपडा (प्रतिनिधी)चोपडा तालुका व शहर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (आय) कमिटीच्या वतीने आज दिनांक २५/११/२०२४ सोमवार रोजी सकाळी १०:०० वाजता कस्तुरबा माध्यमिक विद्यालय चोपडा येथे माजी जिल्हाध्यक्ष जिल्हा काँग्रेस कमिटी जळगाव मा.भैय्यासाहेब ॲड.संदीप सुरेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मासिक सभा घेण्यात आली,तसेच यावेळी पक्षाचे ध्वजारोहण माजी नगरसेविका फातिमाबी ताई पठाण यांच्या शुभहस्ते करण्यात आले.तसेच सुरुवातीला महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री भाग्यविधाते स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले तसेच काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय नेत्या प्रियंकाजी गांधी यांची वायनाड लोकसभा क्षेत्रात प्रचंड मतांनी विजय मिळाल्याने व नांदेड लोकसभा मतदारसंघात रवींद्र चव्हाण यांचा विजय झाल्याने दोघांचा अभिनंदनाचा ठराव पारित करण्यात आला, तसेच डॉक्टर दादासाहेब सुरेश जी पाटील महाविद्यालयाचा युवा रंग महोत्सवात प्राविण्य मिळविल्याने संस्थेचा अभिनंदनाचा ठराव पारित करण्यात आला,यावेळी अध्यक्षस्थानी बोलताना भैय्यासाहेबांनी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी केलेले विविध कामे,धोरणे,निर्णय, कार्यकर्त्यांना अवगत केलेत तसेच नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकी संदर्भात चर्चा करण्यात आली,यावेळी शहराध्यक्ष नंदकिशोर सांगोरे माजी शहराध्यक्ष के.डी.चौधरी सर ,तालुकाध्यक्ष संजीव सोनवणे,सूतगिरणी संचालक वजाहत काझी,मुक्तार सैय्यद,प्रवीण पाटील,सूतगिरणी संचालक राजेंद्र पाटील यांनी मनोगत व्यक्त केलेत.याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती श्री.सुरेश सिताराम पाटील, अल्पसंख्यांक सेल जिल्हाध्यक्ष हमीद शेख,माजी शहराध्यक्ष श्री.के.डी.चौधरी सर,तालुकाध्यक्ष श्री.संजीव सोनवणे शहराध्यक्ष श्री.नंदकिशोर सांगोरे, माजी तालुकाध्यक्ष प्रदीप पाटील,माजी जिल्हा सरचिटणीस अजबराव पाटील,चो.सा.का संचालक श्री.शरद धनगर,श्री.शांताराम लोहार,श्री यशवंत खैरनार,आरिफ सिद्दीक,श्री.देविदास साळुंखे,श्री रमाकांत सोनवणे,अनिल युवराज पाटील,विकास जनकराव पाटील,सतीश कपूरचंद,मोहन देवराम देवकांत चौधरी,विजय कोळी,प्रा.विलास दारुंटे,प्रकाश भाऊराव पाटील,आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण यांची पुण्यतिथी चोपडा काँग्रेस कडून साजरी

Leave a Reply