“संविधान दिन” निमित्त नवी दिल्ली येथे “मेरा संविधान, मेरा स्वाभिमान” पदयात्रेत केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे सहभागी…

जामनेर(प्रतिनिधी)संविधान दिन निमित्त क्रीडा व युवा कार्यक्रम मंत्री माननीय श्री. मनसुख एल. मांडविया जी विविध विभागांचे मंत्री, अधिकारी आणि युवा सहकाऱ्यांसह केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे ह्या नवी दिल्ली येथे “मेरा संविधान, मेरा स्वाभिमान”पदयात्रेत सहभागी झाल्या. ही पदयात्रा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या न्याय्य व लोकतांत्रिक भारताच्या उभारणीत दिलेल्या अतुलनीय योगदानाला समर्पित आहे.10,000 हून अधिक तरुणांसह आजची पदयात्रा उत्साह आणि आशेने भरलेली होती. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधान आपल्याला आपल्या लोकशाही वारशाशी जोडते आणि सशक्त, स्वावलंबी भारतासाठी एकजुटीने पुढे जाण्याची प्रेरणा देते.

ही पदयात्रा केवळ एक यात्रा नाही तर ती आपल्या सामायिक वारशाचा उत्सव आहे आणि 2047 पर्यंत विकसित भारत साकारण्याच्या दिशेने टाकलेले पाऊल आहे. यावेळी चला संविधानाचा आदर्श आपल्या जीवनात रोज अंगीकारण्याचा संदेश यावेळी देण्यात आला. सदर यात्री केंद्रीय मंत्री मा.श्री.पियुष गोयल, मा.श्री.गजेंद्रसिंग शेखावत, मा.श्री.किरेन रिजीजू, मा.श्री.धर्मेंद्र प्रधान, मा.श्री.अर्जुनराम मेघवाल हे सुद्धा यावेळी सहभागी होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *