चोपडा (प्रतिनिधी)शुल्क नियामक प्राधिकरणाचे कामकाज भ्रष्टाचारमुक्त व पारदर्शक पद्धतीने होण्याकरीता शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आझाद मैदान, मुंबई येथे गुरुवार दि. १३ मार्च २०२५ रोजी एक दिवसाचे धरणे आंदोलन,
हे आंदोलन कशासाठी?
1. प्रत्येक विनाअनुदानित स्वयंसहायित तंत्रशिक्षण संस्थेस त्यांनी शिक्षण शुल्क निर्धारण प्राधिकरणास (Fee Regulatory Authority FRA) सादर केलेला प्रस्ताव हा सर्व प्रपत्रांसह त्यांच्या वेबसाईटवर प्रदर्शित करणे हे कायदेशीरदृष्ट्या अनिवार्य आहे. अशा आशयाचे शपथपत्र देखील प्रत्येक संस्थेकडून शुल्क निर्धारण प्राधिकारण घेते. तथापी त्याची अंमलबजावणी होत नाही व त्या बाबत कोणतीही कारवाई देखील होत नाही. संस्थांनी दाखल केलेला संपूर्ण प्रस्ताव सर्वसामान्य जनतेला पाहण्यासाठी उपलब्ध झाला तर संस्थेने दाखवलेला खोटा स्टाफ, खोटी वेतन पत्रके, खोट्या सोईसुविधा ह्या सर्व बाबी उघड होतील आणि हे होवू नये म्हणून शुल्क निर्धारण प्राधिकरण ही माहिती दडवायचा प्रयत्न करीत आहे. व्यापक सामाजिक हीत लक्षात घेवून शुल्क निर्धारण प्राधिकरणाचा कारभार हा भ्रष्टाचारमुक्त व पारदर्शक असणे आवश्यक आहे. ह्या वैधानिक गोष्टीची पूर्तता करण्याकरीता शुल्क नियामक प्राधिकरणाच्या संकेत स्थळावर प्रत्येक कॉलेज संस्था यांनी सादर केलेल्या प्रस्तावाची लिंक त्या त्या कॉलेजच्या नावसमोर प्रसिद्ध करावी ज्यायोगे विद्यार्थी, पालक, शिक्षक, कर्मचारी व समाज ह्या सर्वाना त्या बाबतची माहिती विनासायास उपलब्ध होईल व शुल्क नियामक प्राधिकरणाच्या कामकाजामध्ये अधिक पारदर्शकता येईल.
२. हा भ्रष्टाचार किती मोठा आहे?
महाराष्ट्र राज्यात प्रथम वर्ष इंजिनीयरींगसाठी २०२४-२५ साली १,४९,००० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. इंजिनीयरींग कॉलेजची सरासरी फी रु. १ लाख धरली तर फक्त प्रथम वर्ष इंजिनीयरींगच्या विद्यार्थ्यांकडून रु. १४९० कोटी जमा झाले. आपण असे गृहीत धरु की ४०% संस्थांनी खरी माहिती देवून शुल्क नियामक प्राधिकारणाकडून रु. १ लाख एवढे शुल्क ठरवून घेतले. टॅफनॅपचा असा दावा आहे की ६०% पेक्षा अधिक संस्थांनी खोटी माहिती सादर करून शुल्क नियामक प्राधिकारणाकडून शुल्क निश्चिती करून घेतली आहे. याचाच अर्थ वरील रु. १४९० कोटीपैकी ६०% म्हणजे जवळपास रु. ९०० कोटी रुपये हे बोगस शैक्षणिक शुल्क आहे. असे धरुन चालू की ह्या खोटी माहिती सादर करणाऱ्या ६०% संस्थामधील प्रत्यक्ष उपलब्ध असणाऱ्या सोई सुविधा, शिक्षक व शिक्षकेतर कर्मकारी वर्ग लक्षात घेता ह्या संस्थांचे रु. ५० हजार एवढेच शैक्षणिक शुल्क निर्धारित झाले असते. म्हणजे खोटी माहिती सादर करणाऱ्या संस्थांच्या प्रथम वर्ष शैक्षणिक शुल्कापोटी किमान ४५० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार वर्षानुवर्षे होत आहे. इंजिनीयरींगच्या अभ्यासक्रमाची चार वर्षे लक्षात घेता राज्यातील फक्त इंजिनीयरींग कॉलेजेस मधून १८०० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार राजरोसपणे दरवर्षी होत आहे आणि ह्यास शुल्क नियामक प्राधिकरणाचा अपारदर्शक कारभारच जबाबदार आहे.
१. इंजिनीयरींग सोडून शुल्क नियामक प्राधिकारणाकडून शुल्क निश्चिती होणाऱ्या फार्मसी, मॅनेजमेंट, मेडिकल, आर्किटेक्चर वै. संस्थांचा विचार केला तर भ्रष्टाचाराचा हा आकडा प्रती वर्षी १० हजार कोटींच्या वर पोचणार आहे. गमतीचा भाग म्हणजे ह्या १० हजार कोटीपैकी जवळपास ७०% इतकी रक्कम शासनामार्फत विविध फ्रिशिप्स, स्कॉलरशिप्स इ. माध्यमातून विद्यार्थ्यांना दिली जाते. ह्याचाच अर्थ बोगस माहिती सादर करून शासनाची आणि पर्यायाने शासकीय कर भरणाऱ्या जनतेची दरवर्षी किमान ७ हजार कोटी रुपयांची फसवणूक होत आहे. हा भ्रष्टाचार बंद झाला तर ही रक्कम शासनाला इतर अनेक “लोककल्याणकारी लाडक्या योजनांसाठी” वापरता येईल.
4. संस्थेने शुल्क नियामक प्राधिकारणकडे सादर केलेल्या माहितीची विशेषतः मान्यताप्राप्त कर्मचा-यांची संख्या, वेतनाचा तपशील व उपलब्ध सोई-सुविधा यांची प्रत्यक्ष जागेवर जावून पडताळणी करण्याची कायदेशीर जबाबदारी प्राधिकरणाची आहे. खेदाची गोष्ट म्हणजे अशी कोणतीही यंत्रणा प्राधिकरणाकडे उपलब्ध नाही. गोपनियतेच्या नावाखाली प्राधिकरणाकडून ही माहिती सामान्य जनतेला उपलब्ध करून दिली जात नाही. प्राधिकरणाच्या ह्या कार्यपद्धतीमुळे दर वर्षी हजारो कोटी रुपयांच्या भ्रष्टाचारास खतपाणी मिळत आहे. काही संस्थांमध्ये कर्मचाऱ्यांचे ८ ते १० महिन्यांचे वेतन थकीत आहे तरीही कोणत्याही बाबींची शहानिशा न करता प्राधिकरणाकडून ह्या संस्थांचे शुल्क कसे ठरते ह्याचा खुलासा प्राधिकरणाने करणे आवश्यक आहे. ह्या अष्टाचारास आळा घालायचा असेल तर संस्थांनी सादर केलेली माहिती ही सामान्य जनतेच्या अवलोकनासाठी उपलब्ध करून देणे हाच एकमेव उपाय आहे.
5. महाराष्ट्र विनाअनुदानित खाजगी व्यावसायिक संस्था (प्रवेश व शुल्क यांचे विनियमन) २०१५ अधिनियम मधील कलम १३(२) (ब) नुसार हितसंबंधित घटक याचा अर्थ व्यवस्थापन, संबंधीत संस्थेमध्ये शिकणारे विद्यार्थी आणि त्यांचे पालक असा केला आहे. ह्या कलमाचा आधार घेवून समाजातील कोणतीही व्यक्ती अथवा संघटना यांनी शुल्क नियामक प्राधिकरणाकडे पुराव्यासह तक्रारी सादर केल्या तरी त्या हितसंबंधित घटकांनी केलेली तक्रार नाही म्हणून फेटाळल्या जातात. ह्या कलमामुळे शुल्क नियामक प्राधिकरण भ्रष्टाचाराच्या तक्रारींची दखलच घेत नाही व प्राधिकरणाकडून फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराला प्रोत्साहन दिले जात आहे. व्यापक सामाजिक हित लक्षात घेता कलम १३ (२) (ब) नुसार हितसंबंधित घटक याची व्याख्या अधिक व्यापक करणे आवश्यक आहे अथवा हे कलमच रदद करणे ही काळाची गरज आहे.
6. माहिती अधिकार कायदा कलम ४ बी (१) च्या तरतुदींनुसार शुल्क नियामक प्राधिकरणाने १७ अनिवार्य बाबींची माहिती त्यांच्या वेबसाइटवर प्रकाशित करणे अनिवार्य आहे.
शुल्क नियामक प्राधिकरणाच्या अपारदर्शक कारभारामुळे विद्यार्थी, पालक, शिक्षक, कर्मचारी, समाज व शासनाचे अपरिमित नुकसान होत आहे.
झारीतील शुक्राचार्य बनून गोपनियतेच्या नावाखाली हजारो कोटी रुपयांच्या भ्रष्टाचारास खतपाणी घालणाऱ्या प्राधिकरणाच्या पदाधिकाऱ्यांची उच्चस्तरीय चौकशी करून त्यांचेवर फौजदारी कारवाई होणे आवश्यक आहे.
समाजाच्या सर्व घटकांशी संबंधीत ह्या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधावे ह्या करीता गुरुवार दि. १३ मार्च २०२५ रोजी टॅफनॅप । मुक्ता सारती व इतर समविचारी संघटनांच्यावतीने आझाद मैदान मुंबई येथे एक दिवसाचे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. ह्या आंदोलनामध्ये आपण सक्रिय सहभागी होवून आपले नैतिक कर्तव्य पार पाडावे ही विनंती.
गुरुवार दि. १३ मार्च २०२५ रोजी “चलो आझाद मैदान” आंदोलनामध्ये आपण सहभागी होणार आहोत. आपल्यापैकी काहीजण पहिल्यांदाच आझाद मैदानावरील आंदोलनामध्ये सहभागी होणार असतील. आंदोलनात सहभागी होणाऱ्या सदस्यांसाठी काही सूचना.
१. आझाद मैदान है छत्रपती शिवाजी टर्मिनस (CST) ह्या मध्यरेल्वेच्या स्टेशनमधून सबवेने बाहेर पडले की अगदी समोरच आहे.
२. आझाद मैदानामध्ये अनेक आंदोलने सुरू असतील. टॅफनॅपच्या आंदोलनासाठी आपण स्वतंत्र पेंडॉलची व्यवस्था केलेली आहे. आपल्या आंदोलनासाठी आपण टॅफनॅपच्या पेंडॉलमध्ये यावे. हे आंदोलन टॅफनॅप, मुक्ता, सारती व इतर समविचारी संघटनांच्या वतीने करण्यात येत आहे.
3. आंदोलनासाठी आपल्या युनिटचा किमान ४ x 3 फुट साईजचा फ्लेक्स बॅनर सोबत आणावा. बॅनरचा मजकूर
भ्रष्टाचारमुक्त व पारदर्शक शुल्क नियामक प्राधिकरणासाठी चलो आझाद मैदान टॅफनॅप युनिट (आपल्या युनिटचे नांव)
४. मुंबईमध्ये सध्या उन्हाचा खूप तडाखा आहे, त्यामुळे येताना टोपी, पाण्याची बाटली सोबत ठेवावी.
५. मुंबईमध्ये आपणांस काही अडचण आल्यास खालील व्यक्तींशी संपर्क साधावाः
१. प्रा. राम यादव ८८०६५९०९७४ २.
2. प्रा. गोविंद वाघमारे ८६९१९५२२२७
३. प्रा. सौ. नेहा कोरडे ८६५५१११२०१
६. टॅफनॅपचे हे धरणे आंदोलन कोणत्याही वैयक्तिक मागण्यांकरीत नसून व्यापक सामाजिक सुधारणेसाठी आहे. स्वतः साठी तर आपण रोजच जगत असतो, एक दिवस समाजासाठी द्या, मला खात्री आहे की ह्या आंदोलनामध्ये सहभागी होवून तुम्हाला एक Lifetime Memorable अनुभव मिळेल ज्याचा तुम्हाला कायम अभिमानच वाटेल.
७. सर्वात महत्वाचे टॅफनॅपच्या ह्या ग्रुपवरील जे सदस्य आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत त्यांनी ग्रुपवर आपल्या नावानिशी “मी येतोय, तुम्हीही येणार ना?” असा मेसेज टाकावा. उदा. “मी येतोय, तुम्हीही येणार ना?- प्रा. श्रीधर वैद्य”
८. आपल्या युनिटच्या जास्तीत जास्त सदस्यांना चलो आझाद मैदान आंदोलनामध्ये सहभागी व्हायचे आवाहन प्रा. श्रीधर वैद्य सेक्रेटरी, टॅफनॅप संपर्क क्र. ९४२२०४८५०९ / ९६२३६५३६११ यांनी केले आहे.
Leave a Reply