शासन आपल्या पाठीशी तर आपणही स्वच्छतेच्या बाबत शासनाच्या पाठीशी उभे रहावे-ना. गुलाबराव पाटील “कंपोस्ट खड्डा भरू आपल गाव स्वच्छ ठेवू” अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ.


जळगाव दि.१(प्रतिनिधी): शासन विविध योजना राबविण्यात आपल्या पाठीशी आहे तसे आपणही स्वच्छतेच्या बाबतीत शासनाच्या पाठीशी उभे राहावे असे आवाहन मा.पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री जळगाव ना.श्री गुलाबरावजी पाटील यांनी केले. “कंपोस्ट खड्डा भरू आपलं गाव स्वच्छ ठेवू” या अभियानाच्या जिल्हास्तरीय शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.


शिरसोली प्र. न.मराठी शाळा येथे झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल,प्रकल्प संचालक(पा.स्व) डॉ.सचिन पानझडे, गटविकास अधिकारी सतीश धस,सरपंच हिलाल भील,उपसरपंच द्वारकाबाई बोबडे,, माजी सभापती नंदू पाटील,विष्णू भंगाळे,रामकृष्ण काटोले,श्याम कोगटा आदी उपस्थित होते. पुढे बोलताना ना. गुलाबराव पाटील म्हणाले घरातला गावातला आणि शेतातला उकीरडा आपण कंपोस्ट पीट मध्ये पुरल्यास आपल्या शेतासाठी उपयुक्त खत आपल्यालाच उपलब्ध होईल.

स्वच्छतेबाबत घेतलेली शपथ फक्त कागदोपत्री न राहता त्याची अंमलबजावणी केल्यास तसेच माझं गाव हे माझं अंगण समजल्यास स्वच्छतेचे हे गाव कार्य न राहता देश कार्य होईल असे ते म्हणाले. मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी आपल्या मार्गदर्शनातून कंपोस्ट खतातून उत्तम मूल्य असलेले खत निर्माण होऊ शकते हे स्पष्टीकरण करून सांगितले.यावेळी नाडेफ खड्डा व कचरा विलगीकरण केंद्र यांचे उद्घाटन करून लोकार्पण करण्यात आले. प्रास्ताविक प्रकल्प संचालक डॉ.सचिन पानझडे यांनी तर सूत्रसंचालन क्षमता बांधणी तज्ञ मनोहर सोनवणे यांनी केले.विस्तार अधिकारी राजेश इंगळे,ग्रामसेवक चिंचोरे,संवाद तज्ञ निलेश रायपूरकर, समाजशास्त्रज्ञ भीमराव सूरदास,समूह समन्वयक शिरीष तायडे यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *