जामनेर (प्रतिनिधी)सर्व नागरीकांना कळविण्यात येते की, महावितरण कंपनीच्या वतीने ग्राहकांचे जुने वीज मीटर बदलुन त्या ठिकाणी नवीन स्मार्ट वीज मीटर बसविण्याचे काम एन.सी.सी. या एजन्सी कडून विनामुल्य करण्यात येत आहे. त्यात नवीन स्मार्ट वीज मीटर बसविल्यानंतर जुने वीज मीटर महाविरण कार्यालयात जमा करण्यात येतात. ज्युन्या वीज मीटर संदर्भात तकार नसल्यास जुन्या वीज मीटरची कोणत्याही प्रकारची टेस्टींग केली जात नाही. अगर आर्थिक दंड आकारला जात नाही. परंतु महाविरणचे काही कर्मचारी हे वीज ग्राहकांना तुमचे मीटर फॉल्टी आहे, सील तुटलेले आहे, टेस्टींगला पाठवावे लागेल, दंड भरावा लागेल, तुमच्यावर वीज चोरीचा गुन्हा दाखल होईल असे खोटे सांगुन वीज ग्राहकांकडुन मोठया प्रमाणात लाच घेत असल्याबाबत तपासात व नागरिकांनी ला.प्र.वि., कार्यालयाशी संपर्क साधून कळविले आहे.
तरी सर्व नागरीकांना विनंती करण्यात येते की, आपल्या सोबत देखिल वरील प्रकारे लाचेची मागणी होत असल्यास तात्काळ लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, जळगांव येथे ०२५७ २२३५४७७ वर, टोल फ्री क्रमांक १०६४ वर अथवा श्री.योगेश ठाकूर, पोलीस उप अधिक्षक, ला.प्र.वि., जळगांव यांना ९७०२४३३१३१ या क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन योगेश जी. ठाकूर पोलीस उप अधिक्षक अॅन्टी करप्शन ब्यूरो, जळगांव यांनी केले आहे.
Leave a Reply