जामनेर (प्रतिनिधी)आज दि. 8/2/2025 रोजी मा. संदीप भाऊ राठोड (राष्ट्रीय उपाध्यक्ष) यांच्या अध्यक्षतेखाली व मा. रघुनाथ पवार (जिल्हाध्यक्ष- नाशिक यांच्या उपस्थितीत “वसंतरावजी नाईक अधिकारी कर्मचारी संघटना, जळगाव कार्यकारिणी निवड बैठक संपन्न झाली.
यात सर्वानुमताने मा. विठ्ठल जाधव सर यांची वसंतरावजी नाईक अधिकारी कर्मचारी संघटनेच्या जळगाव जिल्हाध्यक्षीपदी निवड करण्यात आली.
तसेच मा. प्रा. डाँ. गजानन जाधव यांची कार्यध्याक्ष पदी तर मा. प्रा.डाँ.डी.यू.राठोड यांची सचिव म्हणून निवडकरण्यात आली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. बी. बी.धाडी, सर(मा.जिल्हाध्यक्ष-जळगाव) यांनी केले. तसेच सुत्रसंचालन श्री. जितेन्द्र नाईक सर व आभार प्रदर्शन श्री. मनिष राठोड सर यांनी केले.
या बैठकीस श्री. लक्ष्मण राठोड (नासिक), श्री. अशोक चव्हाण (नासिक), श्री. रोहीदास पवार, श्री. प्रा. हेमराज जाधव, श्री. सुरेश जाधव, श्री. राजू नाईक, श्री. बंसीलाल चव्हाण, श्री. अमरसिंग राठोड,श्री.मदन चव्हाण,श्री. विनोद राठोड, श्री. पुखराज पवार श्री. चिंतामण राठोड, श्री. सुनील नाईक व जिल्ह्यातून पदाधिकारी उपस्थित होते.
Leave a Reply