जामनेर (प्रतिनिधी)लॉर्ड गणेशा इंग्लिश स्कूल मध्ये Being Lawful* या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेची सुरुवात सरस्वती पूजनाने झाली. तत्प्रसंगी शाळेच्या संचालक मंडळातील श्री. दिपक पाटील (सहसचिव) तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री. धनंजय सिहं उपस्थित होते.
*Being Lawful* या उपक्रमांतर्गत आयोजित पहिली कार्यशाळा यशस्वीरीत्या पार पडली. संविधानाबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया लेखी स्वरूपात तसेच व्हिडीओ माध्यमातून मिळाल्या असून, त्यातून या सत्राचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो.
या कार्यशाळेचे संचालन MHKC संस्थेच्या सुचेता मॅडम यांनी प्रभावीपणे केले. त्यांनी विद्यार्थ्यांना विषयाशी जोडून ठेवत संपूर्ण सत्राचे चांगले नेतृत्व केले. विभावरी मॅडम यांनी मुलांना मूलभूत अधिकार आणि कर्तव्यांची ओळख करून दिली, तर प्रणव जोशी यांनी भारताच्या कायदेशीर रचनेचे सुलभ सादरीकरण करून संविधाना विषयी सखोल माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांना संविधानाविषयी माहिती देताना भारतीय संविधान हे आपल्या देशाचे मुख्य कायदा आणि मार्गदर्शक तत्त्व आहे. यात भारत कसा चालवायचा, नागरिकांचे अधिकार काय आहेत, सरकारची रचना कशी आहे,
संविधान तयार करणाऱ्या मंडळाला संविधान सभामंडळ म्हणतात हे विद्यार्थ्यांना स्पष्ट करण्यात आले. या सभेचे अध्यक्ष भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे होते जे संविधानाचे मुख्य शिल्पकार मानले जातात. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान तयार झाले आणि २६ जानेवारी १९५० रोजी अंमलात आले. म्हणून २६ जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो.
तसेच भारतीय संविधानात प्रस्तावना (Preamble), भाग (Parts), कलमे (Articles) आणि अनुक्रमणे (Schedules) असतात. प्रस्तावनेमध्ये भारत हा, सार्वभौम (Sovereign) समाजवादी (Socialist) धर्मनिरपेक्ष (Secular) लोकशाही (Democratic)
प्रजासत्ताक (Republic) देश आहे असे सांगितले.
विद्यार्थ्यांना खालील ६ मूलभूत अधिकारांची देखील माहिती देण्यात आली. त्यात
1. हक्क समतेचा (Right to Equality)
2. हक्क स्वातंत्र्याचा (Right to Freedom)
3. हक्क शोषणविरुद्धचा (Right against Exploitation)
4. हक्क धार्मिक स्वातंत्र्याचा (Right to Freedom of Religion)
5. हक्क सांस्कृतिक व शैक्षणिक (Cultural and Educational Rights)
6. हक्क घटनात्मक उपायांचा (Right to Constitutional Remedies)
हे अधिकार सविस्तर समजवण्यात आले.
संविधानाचे महत्त्व सांगत असताना हे देशाच्या नागरिकांना स्वातंत्र्य, समता व बंधुता देण्याचे काम करते. सर्व लोकांना एकसमान न्याय आणि समान संधी मिळण्यासाठी मदत करते. संविधानामुळे आपण लोकशाहीत जगतो, म्हणजे आपण स्वतःच्या प्रतिनिधीला निवडून देतो. थोडक्यात भारतीय संविधान हे फक्त एक कायद्याचे पुस्तक नसून ते आपल्या लोकशाहीचे, स्वातंत्र्याचे आणि एकतेचे प्रतीक आहे. विद्यार्थ्यांनी त्याचा अभिमान बाळगावा आणि आपले कर्तव्य पार पाडावी या संदर्भात विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. अॅड. शुचिता हाडा यांनी कार्यशाळेदरम्यान अत्यंत सूक्ष्म व्यवस्थापन सांभाळले. आदित्य शर्मा यांनी सर्व तांत्रिक बाजू सांभाळत ऑनलाईन गेम सत्र यशस्वीरित्या पार पाडले.
*Being Lawful* हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये संविधानाची जाण व जबाबदार नागरिकत्त्वाची भावना विकसित करण्यासाठी कटिबद्ध आहे. सदर उपक्रम हा अतिशय उत्साहत पार पडला.
या कार्यशाळेची सांगता आभार प्रदर्शनाने झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार उपशिक्षिका मेहविश शेख यांनी केले.
Leave a Reply