लॉर्ड गणेशा इंग्लिश स्कूल , जामनेर येथे शालेय आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा संपन्न…!

जामनेर (प्रतिनिधी)लॉर्ड गणेशा इंग्लिश स्कूल जामनेर येथे शालेय समिती अध्यक्ष मा. अभयजी बोहरा यांच्या मार्गदर्शनाने जिल्हाधिकारी कार्यालय तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ शालेय आपत्ती व्यवस्थापन ‘ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. प्रस्तुत कार्यक्रम प्रसंगी विद्यालयाचे संचालक मा. सतीश मोरे सर , प्राचार्य धनंजाॅय सिंह सर , उपप्राचार्य मा. गणेश पालवे सर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संचलन विद्यालयाचे वरिष्ठ शिक्षक मा. दत्ता देसले सर यांनी केले ” नैसर्गिक आपत्ती ” आणि ” मानवनिर्मित आपत्ती ” असे आपत्तीचे प्रकार असून आपत्ती व्यवस्थापन हे मानवी जीवन , मालमत्ता , आणि पर्यावरणावर होणाऱ्या नकारात्मक परिणामांना कमी करण्यासाठी केले जाणारे कार्य आहे तसेच आपात्कालीन परिस्थितीत समुदायाची लवचिकता वाढवणे , आपदा स्थितीत प्रभावी समन्वय सुनिश्चित करण्यासाठी सज्जता , प्रतिसाद , पुर्नप्राप्ती आणि शमन यावर लक्ष केंद्रित करते. असे त्यांनी आपल्या प्रास्ताविकात प्रतिपादन केले.

तदनंतर जिल्हाधिकारी कार्यालय तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण , जळगाव यांच्यातर्फे निमंत्रित आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षक श्री अक्षय नितीन राजनकर , श्री भगवान नगीनदास पाटील , श्री.गोपाळ रंधाळे तसेच सहकारी ” आपदा मित्र ” यांनी नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्ती उद्भवल्यास अशा आपत्कालीन स्थितीत व्यक्तीला संकटातून बाहेर कसे काढावे ? या संदर्भात चित्तथरारक प्रसंग सादर करून माहिती सांगितली. यामध्ये भूकंप , अपघात , विहिरीत पडणे , महापुरात सापडणे , उंच इमारतीवर अडकलेली व्यक्ती इत्यादी सारख्या स्थितीत सापडल्यास सदर प्रसंगातून बाहेर कसे पडावे ? हे विविध प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून समजावून सांगितले. तसेच साधे स्ट्रॅक्चर , चादरचे स्ट्रॅक्चर , फोल्डेबल स्ट्रॅक्चर , चादर व बांबुचे स्ट्रॅक्चर , बांबू स्ट्रॅक्चर , दोरीचे स्ट्रॅक्चर , यु स्ट्रॅक्चर , कॅरनोमेंटल रोपवे , रोपवेची शिडी , हॉक बॉडी हाॅन्रेस , टेस्टेड हेल्मेट , लाईफ गार्ड , अग्निशमन यंत्र , मॅजिक रोपवे , असेॅडिंग रोपवे , डिसेॅडिंग रोपवे इत्यादी आपात्कालीन साधनांचा केव्हा ? कुठे ? व कसा ? उपयोग करावा यांची तपशीलवार माहिती शालेय आपत्कालीन व्यवस्थापन ” टीम – ए चे ” प्रशिक्षक तथा पथनायक श्री. अक्षय नितीन पाटील व त्यांचे सहकारी ” आपदा मित्र ” यांनी शालेय विद्यार्थ्यांचा कृतीयुक्त सहभाग घेऊन इयत्ता ३ री ते ९ वीच्या विद्यार्थ्यांसमोर लॉर्ड गणेशा इंग्लिश स्कूल जामनेर विद्यालयाच्या भव्य प्रांगणात सादर केली.

कार्यक्रमाचे संचलन श्री. दत्ता देसले सर यांनी तर आभार श्री. विजय मोरे सर यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *