जळगांव (जितेंद्र सोनवणे)रेड स्वस्तिक सोसायटीच्या वतीने लायन्स क्लब मुंबई भगवान महावीर विकलांग केंद्र मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आज जळगाव शहरात दिव्यांग बांधवांसाठी तीन दिवसाच स्वयंसिद्ध शिबिराचा आयोजन सरदार वल्लभभाई पटेल सभागृह जळगाव येथे करण्यात आल असून आज या शिबिरामध्ये जळगाव धुळे संभाजीनगर बुलढाणा अकोला वर्धा येथील २५८ दिव्यांग बांधवांनी सहभाग घेऊन जयपूर फूट कॅलिपर साठी
माप घेण्यात आली होती.
त्या सर्वांना जयपुर फूट व कॅलिपर लावून सर्वांच्या समक्ष स्वयंसिद्ध करून चालवण्यात आल.
हा सोहळा अनुभवतांना प्रत्येकाच्या डोळ्यांमध्ये आनंद भरभरून वाहत होता. यावेळी 20 कर्ण बधिरांना कर्णयंत्रांची वाटप करण्यात आले. आणि ८व्हीलचेअर चे वाटप करण्यात आले. या उपक्रमाचे उद्घाटन श्री प्रकाश दादा पाटील
डॉ. योगिता बावस्कर एड. राजेश झाल्टे यांच्या हस्ते लॉयन्स क्लब मुंबई चे चेअरमन श्री मोतीलाल पूनमिया प्रेसिडेंट श्री दिलीप सुंठेसा श्री दिलीप परमार या मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी रेड स्वस्तिक सोसायटीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष श्री भगवानराव राऊत हे होते
यावेळी राज्याध्यक्ष श्री. हेमंत गोरे श्री भास्करराव काळे संभाजीनगरचे अध्यक्ष मा.उपजिल्हाधिकारी श्री कल्याणराव गवळी उपायुक्त श्री जे बी पाटील कार्यकारी अभियंता श्री वसंतराव हंगारे डॉ. धनंजय बेंद्रे श्री. ज्ञानदीप पाटील डॉक्टर प्रमोद आमोदकर महिला अध्यक्ष सौ मनीषा पाटील प्रकल्प चेअरमन श्री. सत्यनारायणाची खटोड सचिव डॉ. गणेश पाटील प्रकल्प संचालक राहुल सूर्यवंशी श्री दिलीप गवळी श्री कैलास पाटील श्री शरद पांडे श्री शेखर पाटील श्री नवनीत भाई पटेल श्री नितीन बापट श्री खडके श्री विजय मदानी श्री यश पांडे सौ मंजुषा अडावदकर सौ स्मिता तासखेडकर सौ नीता वानखेडकर सौ आशा मौर्य सौ किमया पाटील सौ हर्षा वनारा सौ हर्षाली तिवारी सौ ज्योती राणे सौ प्रेम लता खटोड सौ शिल्पा बयास सौ नेहा जगताप यांच्या सह अनेक मान्यवरांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सो मनीषा पाटील यांनी केले तर स्वागत तर मनोगत श्री सत्यनारायण खटोड यांनी केलं. यावेळी लायन्स क्लब मुंबई चे प्रेसिडेंट श्री दिलीप सुंठेसा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर योगिता बावस्कर श्री भास्करराव काळे श्री संजय ब्राह्मणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी रेड स्वस्तिक सोसायटीचे राष्ट्रीय सहमहाव्यवस्थापक श्री अशोक शिंदे यांनी रेड स्वस्तिक संस्थेच सविस्तर भूमिका विशद केली. आगामी काळात त सर्व संस्थांना सोबत घेऊन मानवतावादी भूमिकेतून आरोग्याचे अनेक उपक्रम करण्याचे जाहीर केले. यावेळी हा उपक्रम यशस्वी करणाऱ्या सर्व मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. या अपंग बांधवांना स्वयं सिद्ध करण्याच्या सोहळ्याचे सूत्रसंचालन श्री ज्ञानदीप पाटील यांनी केले आभार प्रदर्शन श्री राहुल सूर्यवंशी यांनी केले.
Leave a Reply