जामनेर(प्रतिनिधी)राष्ट्रीय परीक्षा परिषद नवी दिल्ली तर्फे इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी दिनांक 22 डिसेंबर 2024 रोजी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक प्रज्ञाशोध परीक्षेत न्यु इंग्लिश स्कूल जामनेरचे 10 विद्यार्थी गुणवत्ता यादीत उत्तीर्ण झाले आहेत. प्रत्येक विद्यार्थी 48 हजार रुपये शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरला आहे . प्रज्ञाशोध परीक्षेत गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता नववी पासून ते बारावीपर्यंत प्रतिवर्षी प्रत्येकी 12 हजार रुपये शिष्यवृत्ती मिळते गुणवत्ता यादीत आलेले विद्यार्थी .
१) यश अनिल डोंगरे २) निशा गजानन पाटील ३) प्राची प्रवीण पाटील ४) नेहा उल्हास पाटील ५) सोनल मनोज भामरे ६) सृष्टी नंदू शेळके ७) अंकिता योगेश पाटील ८) रितिका रवींद्र पाटील ९) दिशा नंदकिशोर सुरळकर १०) भावेश गणेश काठोटे सर्व पात्र विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक एस पी महाजन सर समिती प्रमुख डी एच परदेशी सर सहप्रमुख सी यू पानपाटील सर व व्ही ए पाटील सर यांचे मार्गदर्शन लाभले सर्व गुणवंतांसह मार्गदर्शक शिक्षकांचा सत्कार संस्थाध्यक्ष श्री जितेंद्र बाबुराव पाटील व सचिव श्री जितेंद्र रमेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. सर्व संचालक मंडळाने गुणवंत विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे कौतुक व अभिनंदन केले
Leave a Reply