जामनेर (प्रतिनिधी)जामनेर येथील ज्ञानगंगा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आज दि.०४-१२-२०२४ रोजी राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत जामनेर उपजिल्हा रुग्णालय अंतर्गत राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त आरबीएसके टीम द्वारे सर्व शालेय इ.५ वी ते इ.१२ वी च्या सर्व उपस्थित विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यावेळी विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र सोनवणे यांनी सर्व डॉक्टरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.त्यावेळी डॉ.राजेश सोनवणे तालुका वैदयकीय अधिकारी जामनेर यांनी सर्व विद्यार्थ्यांना आरोग्याबाबत मार्गदर्शन केले. डॉ.पंकज पाटील, डॉ.जितेंद्र वानखेडे,डॉ.स्वाती विसपुते,डॉ.अनिता राठोड, डॉ. हर्षाली गोसावी,डॉ.धनंजय पाटील डॉ.चंद्रमणी सुरवाडे,डॉ. कविता काळे डॉ. निलेश चव्हाण या सर्व टीमने एकूण ८30 विद्यार्थ्यांना तपासणी करून राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त विद्यार्थ्यांना मेडिसिन चे वाटप करण्यात आले.त्यावेळी आरोग्य तपासणी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनी यांनी परिश्रम घेतले.
राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त ज्ञानगंगा विद्यालयात विद्यार्थ्यांचे आरोग्य तपासणी शिबीर संपन्न.

Leave a Reply