राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या जळगाव जिल्हा युवक अध्यक्ष पदी विश्वजित पाटील _युवकांचे प्रश्न सोडवुन पक्षात तरुणांची मोठी फौज उभी करणार आणि शरद पवारांचे विचार घराघरातपर्यंत पोहचविणार-विश्वजित पाटील_

जामनेर (प्रतिनिधी)_दि.०३/०७/२०२५(गुरुवार) रोजी जामनेर तालुक्यातील पाळधी येथील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे युवानेतृत्व विश्वजीत मनोहर पाटील यांची खासदार शरदचंद्र पवार यांच्या आदेशाने, प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील यांच्या मान्यतेनुसार राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष महेबुब शेख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या जळगाव जिल्हा ग्रामिण जिल्हाध्यक्ष पदी विश्वजित मनोहर पाटील यांची नियुक्ती केली आहे. यावेळी नियुक्तीपत्र देतांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील,आ.एकनाथ खडसे, युवक प्रदेश अध्यक्ष महेबुब शेख,प्रदेश उपाध्यक्ष ललित बागुल,प्रदेश सरचिटणीस रमेश पाटील हे उपस्थित होते.
यावेळी जळगाव जिल्हा ग्रामीणचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष विश्वजीत पाटील यांनी बोलतांना सांगितले की, खा.शरदचंद्र पवार यांच्या विचारानुसार पक्षाचे ध्येय धोरणे घराघरात पोहचविण्याचे कार्य करणार असून पक्षाला बळकटी देऊन पक्ष वाढविण्याचे काम करणार आहे.तसेच युवकांचे प्रश्न व सर्वसामान्य युवकांच्या विकासाच्या दृष्टीने काम करणार असल्याचे सांगितले.
मा.विधानसभा अध्यक्ष अरुण गुजराथी,ॲड.रविंद्र पाटील,मा.आ.राजु देशमुख,महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे-खेवलकर,पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील,माजी आ.अरुण पाटील,संतोष चौधरी,दिलिप खोडपे,डिगंबर पाटील,राजेंद्र चौधरी यांच्यासह महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हार्दिक अभिनंदन करत भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *