मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पंप्ड स्टोरेज प्रकल्पासाठी सामंजस्य करार

मुंबई/प्रतिनिधी: महाराष्ट्रातील उर्जा क्षेत्राला नवे बळ देणाऱ्या पंप्ड स्टोरेज प्रकल्पाच्या उभारणीसाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत जलसंपदा विभाग, महाराष्ट्र शासन आणि महाजनको (महानिर्मिती), महाजनको रिन्यूएबल एनर्जी लिमिटेड व अवाडा ग्रुप यांच्यात सामंजस्य करार (MoU) करण्यात आला.या कराराच्या वेळी उपस्थित मान्यवरांमध्ये खालील प्रमुखांचा समावेश होता: ना. गिरीश महाजन, मंत्री, जलसंपदा विभाग, महाराष्ट्र शासन,ना. राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री,महाराष्ट्र शासन,सुजाता सौनिक, अतिरिक्त मुख्य सचिव, जलसंपदा विभाग,श्रीकर परदेशी, प्रधान सचिव, मुख्यमंत्री कार्यालय,दिपक कपूर, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, महाजनको या कराराअंतर्गत राज्यात पंप्ड स्टोरेज क्षमतेची उभारणी केली जाईल, ज्याद्वारे अतिरिक्त वीज साठवली जाऊन ती आवश्यकतेनुसार वापरणे शक्य होणार आहे. या प्रकल्पामुळे ऊर्जा निर्मिती अधिक स्थिर, शाश्वत व पर्यावरणपूरक होणार असून, भविष्यातील उर्जा संकटावर मात करण्यास मदत होणार आहे.

मुख्यमंत्र्यांनी या उपक्रमाचे स्वागत करत सांगितले की, “महाराष्ट्र हे देशातील आघाडीचे हरित ऊर्जा राज्य बनवण्याच्या दिशेने हे पाऊल अत्यंत महत्त्वाचे आहे. उर्जेची मागणी आणि पुरवठा यामध्ये समतोल राखण्यासाठी अशा प्रकल्पांची आवश्यकता आहे.”
जलसंपदा विभाग या प्रकल्पासाठी आवश्यक जलस्रोतांचे नियोजन करेल, तर महाजनको व अवाडा ग्रुप तांत्रिक व वित्तीय बाबतीत सहकार्य करतील. या भागीदारीतून राज्यात दीर्घकालीन उर्जा सुरक्षेला बळकटी मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *