जामनेर(प्रतिनिधी)महाराष्ट्र शासनाच्या “शेतशिवार पानंद रस्ते मोकळे करण्याच्या अभियानाअंतर्गत”, जामनेर तालुक्यातील नेरी बु. शिवारातील माळपिंप्री (डाबरी रस्ता) येथील एकूण ३ किलोमीटर रस्त्यापैकी सुमारे १ किलोमीटर अतिक्रमित रस्ता आज दिनांक २ जुलै २०२५ रोजी अतिक्रमणमुक्त करण्यात आला.
या कार्यवाहीमुळे परिसरातील १५० ते २०० शेतकरी बांधवांना त्यांच्या शेतामध्ये जाण्या-येण्यासाठी मोकळा व सुगम मार्ग उपलब्ध झाला आहे. अनेक वर्षांपासून अतिक्रमीत झालेला हा पानंद रस्ता शासनाच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक प्रशासनाच्या समन्वयाने मोकळा करण्यात आला.
या उपक्रमाद्वारे शासनाच्या शेतकरी हिताच्या धोरणांची प्रभावी अंमलबजावणी होत असून, भविष्यात अशाच प्रकारे अतिक्रमणमुक्त पानंद रस्त्यांची मोहीम अधिक गतीने राबविण्यात येणार आहे.
Leave a Reply